कोलाडमधील सर्वसामान्यांच्या हाकेला धावणारे लालासाहेब शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न!
असंख्य चाहत्यांनी मित्रमंडळींनी वाढदिवसाच्या दिवशी निवासस्थानी जाऊन दिल्या शुभेच्छा!
मित्रमंडळी व जोडलेली माणसं ही माझ्या आयुष्यातील खरी संपत्ती:- लालासाहेब शिंदे
कोलाड (प्रतिनिधी )समस्या घेऊन जाणारा व्यक्ती जो कुठल्याही पक्षाचा असो! जातीचा असो! धर्माचा असो! त्याच्या समस्येचे निवारण होणारच त्याच्यातून मार्ग निघणारच!असे व्यक्तिमत्व म्हणजे कोलाड मधील सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब शिंदे होय.
नुकताच लालासाहेब शिंदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या वाढदिवसाला मित्र मंडळींनी चाहत्यानी तुफान गर्दी केली होती. एखाद्या राजकारणी पुढाऱ्यालाही लाजवेल असा मोठ्या प्रमाणामध्ये मित्र मंडळी लालासाहेब शिंदे यांच्या घरी निवासस्थानी जमले होते.
लालासाहेब शिंदे हे सर्वसामान्यांचे हाकेला धावणारी व्यक्तिमत्व अशी तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे. ते नवज्योत मित्र मंडळ मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून समाजसेवेची व्रत हाती घेऊन राजकारणामध्ये सक्रीय असतात. वरसगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवलेले आहे. वरसगाव प्रभाग क्रमांक तीनच्या विकासासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. निर्भीड नेतृत्व व सर्वसामान्यांचे हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. ते वरसगाव ग्रामपंचायतचे उपसरपंच म्हणून त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. कोलाड महामार्गावर जर कोणाचा अपघात झाला तर अपघातग्रस्तांना मदतीचा हात असतो. शोषित वंचित उपेक्षित तसेच आदिवासी समाजाच्या नेहमी हाकेला धावून जाणारे निस्वार्थी निर्भीड कार्यकर्ते म्हणून कोलाड परिसरामध्ये त्यांचे नाव असून कोलाड रेल्वे रोरो सर्विस चालू करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून ज्या रोरो सर्विसचे त्यांनी अध्यक्ष पद सुद्धा भूषविलेले आहे.
त्यांच्या या रोरो रेल्वे सर्विस चालू करण्यामुळे अनेक बेरोजगारांना रोजगार मिळाले आहे त्यांचा वाढदिवस नुकता साजरा करण्यात आला या परिसरामधून शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील असंख्य मित्रमंडळींनी तसेच परिसरातील आदिवासी बांधव सुद्धा वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अलोट गर्दी केली होती.
यावेळी पत्रकारांशी आपले मत मांडताना लालासाहेब शिंदे म्हणाले की "मित्र हेच माझे आयुष्यातील खरी संपत्ती आहे" या मित्रांच्या प्रेमामुळे मी अनेक संघर्ष केले अनेक संघर्षांवर मात करुन परिस्थितीला तोंड दिले. या यशामागे मित्रमंडळींचा सहभाग आहे मित्रमंडळीच माझी खरी ताकद आहे अशी ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.




Comments
Post a Comment