आपल्या मृत्यू नंतर ही आपले नाव जगाने घेतले पाहिजे असे जिवन जगा:-हभप प्रियाताई निकम 

  कोलाड:- (विश्वास निकम)ज्या प्रमाणे आपल्या परिसरातील हभप पुरुषोत्तम महाराज पाटील उर्फ (बापू )यांनी समाजासाठी केलेले निस्वार्थी समाजकार्य यामुळे ते निघून गेल्यावर त्यांच्या आठवणी समाजात जागृत आहेत. यामुळे जिवन जगत असतांना असे जिवन जगा कि आपण निघून गेल्यानंतर ही आपले नाव समाजात घेतले पाहिजे असे मत हभप प्रियाताई गणेश निकम यांनी हेटवणे येथील निकम भावकीच्या कुळदेवीच्या श्री सत्यनारायणाच्या पूजेनिमित्त आयोजित किर्तन सेवेत व्यक्त केले.

             कुळीची हे कुळदेवी l केली ठायी संतांनी ll१ll बरवे जाले शरण गेलो l उगवलो संकटी ll ध्रु ll आणीला ही रुप बळे l करुनि खळे हरिदासी ll२ll तुका म्हणे समागमें l नाचों प्रेम लागलो ll३ll या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या आधारे हभप प्रियाताई निकम यांनी सांगितले कि आमच्या कुळातील कुळदेवीची संतांनी माहिती करून दिली बरे झालो मी शरण गेलो त्यामुळे माझी संकटे नाहीशी झाली. मोठ्या भक्तीच्या बळावर या संतांनी देवीला नावारूपाला आणले आहे.तुकाराम महाराज म्हणतात संतसंगतीनेच मी कुलदेवीच्या पुढे मी नाचू लागलो.

         यावेळी ऐनघर पंचक्रोशीचे अध्यक्ष मनिष महाराज कदम,जेष्ठ मार्गदर्शक शंकर महाराज मोहिते,विजय शिरसे, तुकाराम महाराज सिरसे,खांडेकर बाबा गायनाचार्य प्रफूल महाराज कणघरे, रवि महाराज यादव, विजय महाराज शिरसे, मृदूंगमणी संदीप महाराज कणघरे,कैलास महाराज बोन्डेकर,बाळकृष्ण भोईर,निरा आत्या दिघे,तेलंगे ताई, ऐनघर पंचक्रोशीतील असंख्य वारकरी,समस्त निकम भावकी, हेटवणे ग्रामस्थ,महिला वर्ग, तरुण वर्ग उपस्थित होते.                                                                              हेटवणे येथील निकम भावकीच्या कुलदैवताच्या श्री सत्यनारायणाच्या महापूजे निमित्त गुरुवर्य हभप नारायण दादा वाजे अलिबाकर व गुरुवर्य हभप भरत महाराज वाजे अलिबाकर यांच्या कृपा आशिर्वादाने ऐनघर पंचक्रोशीतील हरिपाठ,सुप्रियाताई निकम यांची किर्तन सेवा आयोजित करण्यात आली.सर्व कार्यक्रम यशस्विकरण्यासाठी संपूर्ण निकम भावकी यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog