माणगावचे पत्रकार महेश शेलार यांना पितृशोक!

साई / माणगाव ( हरेश मोरे) माणगांव तालुक्यातील खर्डी खुर्द गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले पत्रकार श्री.महेश केशव शेलार यांचे वडील कै.केशव गोविंद शेलार यांचे निधन सोमवार दि.१७ एप्रिल 2023 रोजी सकाळी सुमारे ०१:४५ वा. हृदयविकाराच्या तीव्र झ्टक्याने तसेच अल्पशा आजारामुळे दुःखद निधन झाले. कै.केशव गोविंद शेलार हे तालुक्यातील खर्डी खुर्द येथील रहिवाशी. मृत्यू समयी ते 68 वर्षाचे होते. ते सामाजिक व धार्मिक कार्यात  नेहमी अग्रेसर असायचे त्यांची नेहमीच कोणत्या ना कामासाठी सतत धावपळ असायची. संपूर्ण आयुष्य त्यांनी गावदेवी मातेची पूजा-अर्चा करण्यात घालविले. तसेच कष्ट, मेहनत करून घर कुटुंब चालविला. तसेच सांस्कृतिक नाच मंडळामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. लहान मोठ्या सोबत मिळून मिसळून  राहणारे, आज पर्यंत कधीही कोणाला वेडेवाकडे बोलले नाहीत. तसेच आदिवासी व धनगर समाजाबद्दल त्यांची वेगळीच माया होती.

          तसेच खर्डी खुर्द कुणबी समाज गाव कमिटीचे अध्यक्ष पदही भूषविले होते. ते गवंडीचा काम करत असताना आदिवासी समाजातील लोकांची घरे बांधले परंतु त्यांनी त्यांच्याकडून जास्तीच्या पैशाची कधीही अपेक्षा केली नाही जो कोणीही देईल त्यातच समाधान माणायचे. त्यांच्या घरी आलेला हर एक व्यक्ती कधीही चहा किंवा भाकरी खाल्याशिवाय उपाशीपोटी गेला नाही त्यांच्या या अशा स्वभावामुळे समाजामध्ये त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. गावाच्या किंवा समाजाच्या मिटिंगमध्ये परखड बोलणे, अन्यायाला वाचा फोडणारे, त्यांच्या या विशिष्ट शैलीमुळे समाजात त्यांचा आदर करायचीत त्यांचा अंत्यविधी सकाळी 11.15 वा. झाला. तत्पूर्वी अनेकानी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. केशव शेलार यांच्या मागे पत्नी, तिन मुले, दोन मुली, दोन सूना, तिन नातवंडे, असा मोठा परिवार आहे. तर पत्रकार महेश शेलार हे त्यांचे सर्वात मोठा मुलगा आहे तर कै.केशव शेलार यांचे दशक्रिया विधी बुधवार दि.२६ एप्रिल रोजी तर उत्तरकार्य विधि शुक्रवार दि.२८ एप्रिल २०२३ रोजी त्यांच्या राहत्या घरी होणार आहेत. दरम्यान महेश शेलार यांचे वडीलांच्या  दुःखद निधनपर अनेक पत्रकार तसेच मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog