रानवडे येथे श्री वरद विनायक मंदिर वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
साई /माणगांव (हरेश मोरे)माणगाव तालुक्यातील रानवडे येथे मिती वैशाख शुक्ल पक्ष तृतीया, अक्षय तृतीया शके १९४५, अक्षय तृतीया दिनाच्या निमित्ताने रानवडे ग्राम विकास मंडळ, समस्त ग्रामस्थ आणि महिला मंडळ, श्री गणेश क्रिकेट क्लब, श्री वरद विनायक मंदिर वर्धापन दिन सोहळा सर्वांच्या सहकार्याने शनिवार दि.२२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय तृतीया दिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन उत्साहात संपन्न झाला.
सकाळी ५ वाजता काकड आरती, सकाळी ६ वाजता अभिषेक, सकाळी ६:३० वा. महाआरती, सकाळी ७ वा श्रींच्या पालखीची मिरवणूक, दुपारी २वा. महाप्रसाद,४ ते ५:३० वा. प्रवचन, सायं.६ ते ७ हरिपाठ रात्रौ.७ ते ९ हरि किर्तन, रात्रौ.९ ते १० महाप्रसाद. याप्रमाणे दिवसभरामधे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
अक्षय तृतीया म्हणजे साडेतीन मुहूर्ता पैकी एक पूर्ण मुहुर्त हे अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला जे काही आपण दान धर्म करू. ते अक्षय होत असतं. म्हणजेच अविनाशी, या दानाचा कधीही क्षय होत नाही आणि हे पुण्य आपल्याला फलदायी ठरत असतं. हे पुन्हा कधीही नष्ट होत नाही, अक्षय या शब्दाचा अर्थच असा आहे, की कधीही नाश न होणे, ज्ञान हे फळ प्राप्ती देणारे असते म्हणून या दिवसाला अक्षय तृतीया असे म्हणतात.
रानवडे हे चांदोरे ग्रामपंचायत हद्दीतील गाव असून स्वच्छ्ता असो, सांस्कृतिक किंवा काही सामाजिक उपक्रम असो या गावातील सर्वच बांधव एकत्रित येवून अगदी मनापासून काम करीत असतात, आणि खरोखर रानवडे या गावाकडून खुप काही घेण्या सारखे आहे, हे गाव एक प्रेरणादाई गाव आहे, शनिवार दि.२२/०४/२३रोजी वरद विनायक मंदिर वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला या सोहळ्यासाठी रानवडे गावातील स्थानिक ग्रामस्थ व मुंबई मंडळाचे मान्यवर पदाधिकारी व तरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पंचक्रोशि तील तमाम गणेश भक्त बहु संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment