गोवे येथे श्री.हनुमान जयंती उत्सवा निमित्ताने विविध कार्यक्रम
कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण ) रोहा तालुक्यातील निसर्ग रम्य परिसरातील गोवे येथे श्री. हनुमान जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून बुधवार दि.५ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११.०० वा. श्री. सत्यनारायणाची महापूजा,सायं.६ ते ७ वा. किल्ला व कोलाड विभाग वारकरी संप्रदाय यांचा हरिपाठ,रात्री ९ ते ११ वा.श्रीमत भागवतगीता ज्ञानेश्वरी कंठ भुषण ह.भ.प.अशोक महाराज जाधव (खोपोली )रात्री ग्रामस्थ मंडळ गोवे यांचा हरि जागरण होईल.
गुरुवार दि.६ एप्रिल २०२३ रोजी सायं.४ वा.श्री.हनुमान पालखी सोहळा व भव्य मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी गावाकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव, सचिव श्रीधर गुजर,खजिनदार कमलाकर शिर्के,उप सचिव प्रविण पवार,सहखजिनदार सुरेश जाधव,सदस्य राजेंद्र जाधव,बळीराम जाधव, शंकर दहिंबेकर,शांताराम घरट, नथुराम मांजरे, व समस्त ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ व तरुण वर्ग मेहनत घेत आहेत.
Comments
Post a Comment