कोणत्याही पुढाऱ्यांनी येऊन दहशत दाखविण्याचे दिवस संपले त्यामुळे भविष्य काळात कोलाड परिसरातील लोकांनी कडी लावून बसण्याची आवश्यकता नाही:-माजी आ.धैर्यशील पाटील,

 शेकडो पुई ग्रामस्थांनी केला भाजप मध्ये प्रवेश, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का!

  कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)  गेले ते दिवस ! एक काळ असा होता कि प्रत्येक गावात एक खोत किंवा पाटील असायचा तो कुणाला बोलुन देत नव्हता परंतु आता कोण कुणाचे ऐकत नाही.समाजात जे परिवर्तन घडत आहे. ते महाराष्ट्राच्या व भारताच्या राजकारणात घडत आहे.कोणत्याही राजकीय पुढऱ्याने यावे व कोणाला तरी दशहत दाखवावी ते दिवस संपले पुई कराना भीती बाळगण्याचे कारण भविष्य  काळात कोलाड परिसरातील लोकांनी कडी लावून बसण्याची अवशक्यता नाही.मी एवढ्याचसाठी सांगू शकतो राजकारणातील मोठया घराण्याच्या नंतरच्या पिढीने जनतेची नाळ तशीच ठेवली तर ते पुढे जातील नाहीतर मीच बोलेलं ते असे बोलायची वेळ आली तर प्रत्येक गावात पुई गावासारखी वेळ आल्याशिवाय राहणार नाही असे मत पुई गावातील शेकडो ग्रामस्थांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर मार्गदर्शन करतांना माजी आ. धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले.

      यावेळी आ.प्रशांत ठाकूर,आ.रवि पाटील,अविनाश कोळी, मिलिंद पाटील, हेमाताई मानकर, वैकुंठ पाटील, राजेश मपारा,दिलीप भोईर,बबलु सय्यद, सोपन जांबेकर,अमित घाग,नितीन तेंडुलकर,अनंत सानप, संजय लोटणकर,महेश ठाकूर,शैलेश रावकर,रविंद्र मामळुस्कर,रविंद्र तारू, रविंद्र शिंदे,रघुनाथ कोस्तेकर, अजित लहाने,विठ्ठल पवार,कल्पेश माने,संतोष लाड, राजेश थिटे, निलेश घावटे यांच्या सह रोहा तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

     आ. प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि ज्या भारतीय जनता पक्षाचे सदस्य १२ कोटी आहे अशा पक्षात प्रवेश केला आहे. ज्या देशाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असून ते जगभरात प्रिय झाले आहेत.त्यांच्या माध्यमातून सबका साथ,सबका विकास,सबका विश्वास, हे सूत्र अवलंबला जातोय,यांच्या माध्यमातून साडे आठ कोटी उज्वला योजना, अकारा कोटी सौचालय, पोषण आहार,१२ रु. मध्ये २लाखाचा विमा,३३० रुपयामध्ये २ लाखाचा अपघात विमा, प्रत्येक शेतकऱ्यांना ६ हजार रुपये,जल जिवन योजने अंतर्गत घर घर पाणी, अशा अनेक योजना केंद्र सरकार तर्फे सुरु करण्यात आल्या परंतु कोणतरी येतो नारळ फोडतो व बोलतो आमच्यामुळे झाले असे खोटे बोलतात अशा वेळेला गोव्हेस निकीचा नाव बदलून तटकरे नीती असे नाव दिले पाहिजे.तटकरे कुटूंबाला अशी सवय झाली आहे.एका कुटूंबातील दोन वेळा पालकमंत्री झाल्यावरही रोहा तालुक्याला उपयोग होणार नसेल तर ग्रामस्थांच्या मनात हा विचार येणार यामुळे हा पक्ष प्रवेश आहे.

 आ.रवि पाटील  यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि रोहा तालुक्यात एवढ्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.१७ वर्षे तटकरेचा बाप येथे सभापती होते.१७ वर्षानंतरची पुढची पिढीची जर गणती केली तर मला वाटते या तालुक्यात दुसरा कोणताही पुढारी झालेला नाही. एक गाव, एक घर,आमदार पाच, खासदार एक,आपल्याला या ठिकाणी सांगितले पाहिजे कि सर्वसामान्य माणसांचा बहुसमाजाचा असा कोणीच माणूस तो आता आपल्याला रोहा मध्ये निर्माण करायचा आहे. या मतदान संघातील पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या जागा निवडून आणायच्या आहेत तर लोकसभेच्या निवडणूक या मतदान संघातून ५० हजार मतधिक्याची आघाडी मिळवून ही वंशावळ निकालात काढायची आहे. आता ठेवणे नाही.यापुढे पुई ग्रामस्थांसाठी शिवाजी महाराजांचा स्मारक बांधण्यात येईल याबरोबर विविध विकास कामे ही केली जातील.

     यावेळी पुई गावातील अनंत सानप यांच्या नेतृत्वाखाली शेकडो ग्रामस्थ व महिला वर्गानी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे सर यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर  सानप यांनी केले.

Comments

Popular posts from this blog