घोसाळगड उर्फ विरगड किल्ल्यावर शिव छत्रपतींच्या जयघोषात शिवऊर्जा मित्र मंडळाची गडसंवर्धन स्वच्छता मोहीम!
रोहा (राजेश हजारे)रोहा येथील शिवऊर्जा मित्र मंडळाच्या सभासदांनी गडसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत विरगड किल्ल्यावर नुकतीच स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमाबद्दल सहभागी सर्व शिवप्रेमींचे अभिनंदन केले जात आहे.दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहीम याअंतर्गत शिवऊर्जा मित्र मंडळाच्या सभासदांनी महा दरवाजा परिसराच्या पुर्वेकडील खालील भागात बुरुजाचे निखळलेले चिरे हे मातीतुन बाहेर काढण्यासाठी मुलांनी अथक श्रमदान केले तसेच अनेक ठिकाणी तटबंदीत आलेले तण आणि झुडुपे काढून तटबंदी मोकळी करण्यात आली.
तर, महादरवाजा जवळील परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच शाळेच्या उन्हाळी सुट्टीत शिवऊर्जा मित्र मंडळातील छोट्या बाल-गोपाळांनी गडावरील बाटल्या, प्लास्टिक बॉटल, रॅपरचा कचरा जमा करून गडाखाली आणण्यात आला.दुर्गसंवर्धन आणि स्वच्छता मोहिमेंतर्गत शिवऊर्जा मित्र मंडळाकडून अनेक महीने सातत्याने हा उपक्रम विरगड किल्ल्यावर राबवत आहे. या मोहिमेत अनेक शिवप्रेमींनी सहभाग घेतला.
सदर मोहिमेंतर्गत किल्ल्यावर लोकसहभागातून दिशादर्शक तसेच स्थलदर्शक फलक रस्तालगत लावण्यात येणार आसल्याचे शिवऊर्जा मंडळाचे अध्यक्ष श्री समीर दळवी यांनी सांगितले. या मोहिमेत स्थानिक गावकरी श्री.स्वप्निल गांगल ,श्री अनिकेत दांडेकर यांचे सहकार्य वेळोवेळी लाभते. तसेच आज नव तरुण युवक गडसंवर्धनाच्या शिवकार्यासाठी काम करण्यास तयार होताना दिसत आहेत ही खरच मंडळाच्या जमेची बाजु आहे. याचे श्रेय माझ्या सहकार्यांचे आहे. सर्वांच्या आर्थिक- शारीरिक सहभागातून हे साध्य होत आहे
तरी अजून ही काही समाजातील तरुणांना वाटत असेल की राजांच्या या शिवकार्यात सहभागी व्हावे तर संकोच न करता आमच्याशी संपर्क करा. आमच्या फेसबुक माध्यमातून आमच्या पेज शी कनेक्ट व्हा .त्यावर आमचे नवनवीन अपडेट हे तुम्हाला वेळोवेळी समजले जातील असे मोहीम अंती निरोप समारंभातुन अध्यक्षांनी आपले मत व्यक्त केले. या गडसंवर्धन मोहीमेत २५ हुन अधिक लहान -मोठे वयोगटातील शिवप्रेमी सहभागी झाले होते. हा वेगळा अनुभव असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
Comments
Post a Comment