तळा तालुका तहसीलदार पदी श्रीमती स्वाती पाटीलतळा (कृष्णा भोसले) तळा तालुक्याचे तहसीलदार ए. एम. कनशेट्टी यांची बदली झाल्याने नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांनी आपला पदभार स्विकारला आहे. 

   तहसीलदार झोपडपट्टी व पुनर्वसन प्राधिकरण पिंपरी चिंचवड क्षेत्र व पुणे तहसीलदार पदी असलेल्या श्रीमती स्वाती पाटील यांची तळा तहसीलदार पदी शासनाने नियुक्ती केली आहे. त्यांनी वार सोमवार १७ एप्रिल रोजी आपल्या पदाचा कार्यभार घेऊन कामकाजाला सुरवात केली आहे. 

      प्रशासनाचा उत्तम अभ्यास असलेल्या स्वच्छ प्रतिमेच्या व स्मितहास्य असलेल्या तहसीलदार तळा सारख्या दुर्गम डोंगराळ भागात असलेल्या तालुक्यात जनतेची सेवा, प्रशासनावर वचक ठेऊन शिस्तबद्ध पद्धतीने  कामकाज करतील अशी आशा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.


 तळा तालुका पत्रकार संघाच्या वतीने तळा तहसीलदार श्रीमती स्वाती पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करताना अध्यक्ष कृष्णा भोसले,व कार्याध्यक्ष सौ संध्या पिंगळे, सरचिटणीस श्रीकांत नांदगावकर, छायाचित्रात दिसत आहेत.

Comments

Popular posts from this blog