संघर्ष आपापसात न करता समाजात चाललेल्या चुकीच्या गोष्टीसाठी करा:-आ.अनिकेत तटकरे

   कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती असून आजचा दिवस आनंदाचा आहे.कारण त्यांच्यामुळे  आपण मोकळेपणाने श्वास घेऊ शकतो. मुक्त पणाने संचार करू शकतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बोलायचे झाल्यास एक दिवस ही कमी पडेल इतके त्यांचे महान कार्य आहे. कारण त्यांनी घटनेपासून, संविधान, व मतदानाचा अधिकार मिळवून दिला.महाडचा सत्याग्रह केला.तर शिका, संघटित व्हा, संघर्ष करा या त्याच्या विचारावर आजची पिढी संघटित होत आहे.परंतु संघर्ष करायचा असेल तर आपापसात न करता समाजात चालत असलेल्या चुकीच्या गोष्टीसाठी संघर्ष करा असे मत आ. अनिकेत तटकरे यांनी भीमज्योत नगर गोवे येथील बुद्धविहाराचे उद्धघाटन प्रसंगी व्यक्त केले.

  तसेच ग्रामपंचायतीच्या माध्यमातून  समाज घटकाला १५% निधी अभिप्रत असतो.तो योग्य पद्धतीने देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला असून यामुळे हा लोकार्पण सोहळा पार पडत आहे.तसेच ज्यांनी बुद्धविहारासाठी जागा ते मधुकर गायकवाड यांचे ही विशेष अभिनंदन कारण आज कोणीही हातभर जागा देण्यासाठी तयार नसतो परंतु यांच्या सारखी दानसूर व्यक्तीमुळे आमचे काम सोपे होते.

  यावेळी विशेष अतिथी भदंत विमांसा,गोवे ग्रामपंचायत सरपंच महेंद्र पोटफोडे,विभागीय अध्यक्ष नरेंद्र जाधव,विभागीय अध्यक्षा सुप्रिया जाधव,ग्रामपंचायतीचे  उपसरपंच रंजिता जाधव,सदस्य नरेंद्र पवार,नितीन जाधव,निशा जवके,भावना कापसे,अंजली पिंपळकर, सुमित गायकवाड,ग्रामसेवक गोविंद शिद,युवा नेते संदीप जाधव,संजय मांडळुस्कर,राकेश कापसे,राजेंद्र जाधव,नितीन जवके, किरण पवार,विनायक जवके,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम पवार,गावाकमेटी अध्यक्ष नामदेव जाधव,पोलिस पाटील सुरेश जाधव,पोलिस हवालदार माने,जेष्ठ कार्यकर्ते, राजेश शिर्के,मनोहर मांजरे, सुभाष वाफिलकर,रामचंद्र कापसे,रमेश गायकवाड, शांताराम गायकवाड, गोविंद गायकवाड, मनोहर गायकवाड, यादव गायकवाड, अशोक गायकवाड,केशव गायकवाड,यांच्यासह असंख्य ग्रामस्थ,महिला वर्ग, तरुण वर्ग उपस्थित होते.

    भीमज्योत मित्रमंडळ तर्फे धम्म ध्वजरोहन, बुद्ध वंदना,बुद्धविहाराचे उद्धघाटन,बुद्धमूर्ती व बाबासाहेब यांच्या मूर्तीची स्थापना, महापुरुषांची मिरवणूक,जाहीर सभा असे विविध कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न करण्यात आले. सर्व कार्यक्रम यशश्विकरण्यासाठी भिमज्योत मित्रमंडळाचे अध्यक्ष मिलिंद गायकवाड,उपाध्यक्ष रामजी गायकवाड,सचिव सिद्धार्थ गायकवाड,उपसचिव नथुराम गायकवाड,खजिनदार नागेश गायकवाड, हिशोबतपसणीस नयन गायकवाड,रुपेश गायकवाड,सर्व मुंबई कमेटी, भीमज्योत मंडळाचे ग्रामस्थ, महिला मंडळ, तरुण वर्ग यांनी मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog