सोनसडे ग्रामपंचायतीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी!
तळा (कृष्णा भोसले) तळा सोनसडे तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत सोनसडे येथे१४ एप्रिल 2023 रोजी सकाळी ९:३० वाजता सरपंच माधुरी पारावे यांचे हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प मालिका अर्पण करून जयंतीला सुरवात झाली. यावेळी माजी सरपंच तथा सदस्य परशुराम वरंडे,सोनसडे अध्यक्ष देवजी गावडे, वावेहवेली अध्यक्ष महादेव पारावे, जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माळी, बौद्ध पंचायत समिती तालुका अध्यक्ष अनंत मोरे, समता सैनिक प्रशांत माळी, चांगुल माळी,महीला बंधू भगिनी, ग्रामस्थ, कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आली. त्यानंतर अनंत मोरे, ग्रामपंचायत सदस्य परशुराम वरंडे, ग्रामसेवक उमाजी माडेकर, जेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माळी, देवजी गावडे, सरपंच माधुरी पारावे, पत्रकार कृष्णा भोसले आदीनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर भाषणे केली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments
Post a Comment