श्री.रा.ग. पोटफोडे (मास्तर)खांब या विद्यालयातील सन १९९८-९९ च्या एस.एस.सी. माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सत्कार व सिलिंग फॅनचे वाटप

 कोलाड (विश्वास निकम, रायगड भुषण)रोहा तालुक्यातील नवजिवन प्रसारक मंडळ खांब संचालित श्री.रा.ग पोटफोडे (मास्तर )विद्यालय व कै.द.ग.तटकरे कनिष्ठ महाविद्यालय खांब या विद्यालयातील सन १९९८-९९ मधील माजी विद्यार्थ्यांकडून माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. याबरोबर या विद्यालयास १२ सिलिंग फॅन भेट म्हणून देण्यात आले.

        शनिवार दि.१ एप्रिल २०२३ रोजी ज्या विद्यालयात आपण शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नोकरी व विविध व्यवसाय करू शकलो.त्या विद्यालयातील शिक्षकांची सामाजिक बांधिलकी राखत सन १९९८-९९ च्या एस.एस.सी मधील माजी विद्यार्थी यांनी माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला तसेच नवजीवन प्रसारक मंडळ खांब या विद्यालयास भेट वस्तू म्हणून १२ सिलिंग फॅन वाटप करण्यात आले.तसेच गेल्या वर्षी याच विद्यार्थ्यांनी नव्याने बांधण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीत शिक्षकांसाठी लॉकर दिले होते.                                    यावेळी माजी विद्यार्थी अलंकार अधिकारी, मनोज म्हसकर, सुशिल परबळकर, अमोल पारठे, उर्मिला पोटफोडे, तुकाराम चितळकर,नितीन सानप, निलेश म्हसकर. प्रतिक्षा ढमढेरे, प्रियांका ढमढेरे, मंजूला पिंपळकर,मुकेश मोरे, विनायक पिंपळकर, शर्मिला, संजीवनी जाधव, संतोष भोसले, सुगंधा ढाणे आदी  माजी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष महेंद्र पोटफोडे,उपाध्यक्ष राम कापसे, सचिव धोंडू कचरे, शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष प्रकाश थिटे,विठ्ठलवाडी हायस्कूल स्थानिक स्कूल कमेटी अध्यक्ष रामचंद्र चितळकर, माजी शिक्षक धनवी सर, खांडेकर सर,भोसले सर, म्हात्रे आर जी सर, म्हात्रे बी.पी.सर,मुख्यध्यापक जंगम सर, तसेच सहकारी धामणसे सर, तुपकर सर, चाटाले सर, पोटफोडे सर, योगेश धामणसे, घरट मॅडम, म्हसकर मॅडम, घरत मॅडम, वरखले मॅडम, लोखंडे मॅडम, धनावडे मॅडम, कळमकर मॅडम, सचिन कांबळे, वारगुडे सर, खांडेकर सर, मरवडे सर, चितळकर सर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog