उत्तर भारतीय महासंघच्यावतीने रोह्यात सार्वजनिक छठ पुजा मोठ्या उत्साहात साजरी
कोलाड (श्याम लोखंडे) उत्तर भारतीय यांचा महत्वाचा उत्सव छठपुजा रविवारी सायंकाळी व सोमवारी पहाटे कुंडलिका नदीच्या किनारी नदी संवर्धन येथे तालुक्यातील उत्तर भारतीय समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यासाठी सायंकाळी महीला मोठ्या संख्येने उपस्थित राहुन रविवारी मावळता सुर्य तर सोमवारी उगवत्या सूर्याची मनोभावी पुजा केली.
रविवारी सायंकाळी मान्यवरांचे स्वागत उत्तर भारतीय संघाच्या वतीने करण्यात आले तर सोमवारी पुजा निमित्ताने उपासक महीलांचे उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह यांच्या वतीने साडी देवून सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील, सरचिटणीस सुरेश मगर, सरपंच नरेश पाटील,रामाशेठ म्हात्रे,अमित मोहीते, मनोहर सुर्वे,आदर्श उत्तर भारतीय महासंघ अध्यक्ष लालताप्रसाद कुशवाह, विश्वकर्मा सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष राजकुमार विश्वकर्मा,पुजा कमेठी अध्यक्ष बाबुलाल वर्मा,सचिव मुनेश्वर वर्मा,खजिनदार संतोष विश्वकर्मा,रामप्रकाश कुशवाह, सुरेंद्र मिश्रा,अमित पांडे,सत्यदेव कुशवाह,हेमंत यादव,बसंत विश्वकर्मा,ब्रिजलाल विश्वकर्मा, राजेंद्र जयस्वाल,धनंजय सिंग, हरिश्चंद्र विश्वकर्मा,धीरज विश्वकर्मा,हरीश विश्वकर्मा,भिम विश्वकर्मा, नागेंद्र विश्वकर्मा,दिलीप विश्वकर्मा,सुभाष साहणी आदी उपस्थित होते.
Comments
Post a Comment