सुकेळी खिंडीत खड्डा चुकवतांना कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर पलटी,सुदैवाने ट्रेलरचालक किरकोळ जखमी
कोलाड (विश्वास निकम) रायगड भुषण )मुंबई-गोवा महामार्ग ६६ वरील खांब गावच्या हद्दीत सुकेली खिंडीच्या उतारावर नागोठणे कडून पास्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यातील खड्डे चुकवतांना ट्रेलर चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पलटी झाला यामध्ये सुदैवाने ट्रेलर चालक किरकोळ जखमी झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या रस्त्याची भयानक अवस्था पाहता या महामार्गांवर दररोज अपघात होऊन अनेकांना नाहक प्राण गमवाया लागत आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशी वर्गातून केला जात आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार नागोठणे कडून विळे येथे पास्को कंपनीकडे कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रेलर रस्त्यातील खड्डे चुकवतांना ट्रेलर गाडी नं. एमएच ४६ एएफ ५०१५ या क्रमांकाचा ट्रेलर सुकेली खिंडीत उतारावर आली असता पलटी झाली असून या ट्रेलचा चालक आझाद खान वय २६ वर्षे हा जखमी झाला असून त्याला वाकण महामार्ग पोलीस यांनी उपचारासाठी जिंदल रुग्णालयात हळविण्यात आले व त्यांच्या उपचार करुन सोडण्यात आले अधिक तपास महामार्ग पोलिस केंद्र वाकण येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. बी.सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रेलर बाजूला करून अधिक तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment