ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब च्या विद्यार्थ्यांनी सुरगड केला सर
साहसच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थी निसर्गाशी झाले एकरूप
कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथील विद्यार्थ्यांनी साहस या उपक्रमांतर्गत ट्रेकिंग म्हणून एक आगळा वेगळा विषय घेऊन या परिसरातील शिवकालीन ऐतिहासिक ठेवा म्हणून ओळखला जाणारा रोहा तालुक्यातील खांब पंचक्रोशीतील वैजनाथ गावाच्या माथ्यावरील व घेरासुर गावाची ओळख असलेले सुरगड सर करत येथील निसर्गाशी एकरूप होण्याच्या एकदिवसीय आनंद लुटला.
खांब परिसरात इंग्रजी माध्यमाच्या शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या ज्ञानांकुर इंग्लिश मिडीयम स्कूल खांब येथील इयत्ता पाचवी ते आठवी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी वर्गानी सुरगड सर करत येथील ऐतिहासिक माहिती घेत गडावरील अनसई देवीचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी गड परिसर येथील शिवकालीन बुरुज,तोफ,पाण्याची कुंड तलाव ,महाल,झाडे झुडपे,दगड गोटे, खाना खून ,झाडांवरील फाद्यांची ओळख ,त्याकाळात रस्ता मार्ग कसा शोधला जायाचा ही अभ्यासपूर्ण माहिती घेत येथील निसर्गाशी एकरूप होत याचा आनंद लुटला .
यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र लोखंडे, मुख्याध्यापिका सौ रिया लोखंडे,शिक्षिका सोनाली शिंदे,रुपाली मरवडे,प्रतीक्षा धामणसे,स्नेहा मोहिते,शुभदा भालेकर,ऋतुजा पवार,शिक्षक विनायक माहीत ,मदतनीस श्रुती वाजे ,आदी शिक्षक वृंद व शाळेतील एकूण बत्तीस विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक व प्रसिद्ध असलेल्या या सुरगडावरील साहस उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या गोष्टींची माहिती घेत गड सर केला.
तर गिर्यारोहना साठी, मुलांमध्ये साहस निर्माण होण्यासाठी, निसर्गरम्य व एकरूप होण्यासाठी निसर्गातील घटकाची माहिती दिली, जंगलात रस्ता कसा शोदायचं, पाऊल वाटा त्या पावलावरून त्यावरील खुणा या खुणेवरून रस्ता कसा काढायचं हे शिकविले. दगडाच्या खुणा, झाडाच्या फ़ांद्या वरून आपला सवंगडी कोणत्या दिशेला गेला आहे हे कसे हे कसे ओळखावे याची सखोल माहिती रविंद्र लोखंडे व गडावरील चोपदार किशोर सावरकर व महेंद्र पारटे यांनी दिली.
Comments
Post a Comment