रंजना पाटील यांचे दुःखद निधन

कै. रंजना पाटील 

  कोलाड (विश्वास निकम )रोहा तालुक्यातील वरवठणे येथील रहिवासी रंजना रामचंद्र पाटील यांचे रविवार दि.३०/१०/२०२२ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ४८ वर्षांचे होते. त्या अतिशय प्रेमळ व परोपकारी स्वभावाने सर्वाना परिचित होत्या.त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटूंबावर दुःखाचे डोंगर पसरलेले आहे.

                त्याच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सामाजिक,राजकीय,वारकरी संप्रदायाचे असंख्य नागरिकांसह समस्त वरठवणे ग्रामस्थ उपस्थित होते.त्यांच्या पश्चात त्यांचे पती रामचंद्र पाटील,मुलगा प्रथमेश, मुलगी,दक्षता व मोठा पाटील परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी व उत्तर कार्य विधी दोन्ही एकाच दिवशी शुक्रवार दि.११/११/२०२२ रोजी त्यांच्या वरवठणे येथील निवास्थानी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog