रोहा सुकेळी खिंडीमध्ये घडले रानगव्याची दर्शन!

पोलीस जनार्दन मेंगाळ यांच्या सतकर्तेमुळे अनर्थ टळला,

 परिसरातील नागरिकांनी जागरूक राहावे. सहाय्यक वनसंरक्षक अलिबाग संजय कदम यांचे आवाहन, 

 रायगड (भिवा पवार)रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील सुकेळी खिंड येथे येथे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास रानगव्याचे दर्शन घडले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की रायगड ज़िल्हातील मुंबई गोवा महामार्गांवर असणाऱ्या सुकेळी खिंडीमध्ये 28 ऑक्टोबर रोजी पाचच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला नर जातीचा रानगवा दिसला यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे पेट्रोलिंग साठी ड्युटीवर असणारे नागोठणे पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष पोलीस जनार्धन मेंगाळ यांना दिसला पोलीस नाईक जनार्धन मेंगाळ यांनी प्रसंगवधान राखून रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागृत केले. तसेच याबाबत आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग करून पत्रकारांना सुद्धा माहिती देण्यात आली.

  रानगवा रागीट प्राणी तसेच हिस्त्र प्राणी असल्याचे बोलले जात आहे.पोलीस जनार्दन मेंगाळ यांनी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना जागरूक केले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

 याबाबत सहाय्यक वनसंरक्षक अलिबाग संजय कदम यांच्याशी संपर्क साधला असता ज्या भागांमध्ये गवा आढळला त्या भागामध्ये आम्ही वनाधिकाऱ्यांना पाठवून योग्य त्या सूचना देऊन तो मनुष्य वस्तीत येणार नाही याची काळजी घेऊ. तसेच गवा ज्या भागात दिसला त्या भागामध्ये गस्त घालून कोणत्याही प्रकारची जीवित हानी होणार नाही याची काळजी घेऊ. तसेच परिसरातील लोकांनी सुद्धा यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जर त्या परिसरामध्ये गवा दिसला तर संबंधित वनविभागाला कळविन्याचे आवाहन सहाय्यक वन संरक्षक अलिबाग संजय कदम यांनी केले आहे. याबाबत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची घेऊ अशी माहिती देण्यात आली. रान गवा खूप हिस्त्र रागीट असून प्राणी असून त्याच्या जवळ न जाता त्याची छेडछाड न करता त्याच्यापासून दूर राहून तत्काळ वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे तसेच प्रसगांवधान राखून जनतेला सावध करणाऱ्या पोलीस जनार्धन मेंगाळ यांचे सुद्धा अभिनंदन केले आहे.

 रानगवा प्राणी आपल्या रायगड जिल्ह्याच्या जंगलामध्ये सहसा आढळत नाही मात्र पहिल्यांदाच रायगडच्या जंगलामध्ये रानगवा दिसल्याने जनतेने सुद्धा आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Comments

Popular posts from this blog