सारीपाट व बनाटी खेळाचे खिलाडी सहादेव पांडुरंग खांडेकर यांचे दुःखद निधन

कै. सहदेव पांडुरंग खांडेकर 

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील खांब परिसरातील मौजे चिल्हे येथील सारीपाट खेळाचे खिलाडी,उत्कृष्ठ बनाटी बहाद्दर,प्रगतशील शेतकरी,सामाजिक शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्राची मोठी आवड बाहे विविध सोसायटीचे अनेक वर्षे चेअरमन पद भूषविलेले शेकापचे जेष्ट नेते सहादेव पांडुरंग खांडेकर यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मंगळवारी पहाटे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाल्याने खांडेकर परिवारावर दुःखाचे डोंगर तर परिसरात शोककळा पसरली आहे.

रोहा तालुका कुणबी समाजाचे उपाध्यक्ष व ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चाचे जेष्ठ कार्यकर्ते व खांब विभागीय शेकापचे नेते मारुती खांडेकर सर यांचे वडील सहादेव खांडेकर यांनी कुणबी समाजनेते तथा माजी आमदार कै.पा. रा.सानप, रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व शिक्षण महर्षी रा.ग.पोटफोडे (मास्तर) यांच्या खांद्याला खांदा लावत सामाजिक कार्य करत उत्तमरीत्या शेती व्यवसाय सांभाळले आपल्या शेती व्यवसायाबरोबरच त्यांनी शेतकरी कामगार पक्ष संघटना वाढीसाठी त्याकाळात अथक परिश्रम घेतले.मुलांना उच्च शिक्षण देत सक्षम बनविले सारीपाट,बनाटी, मलखांब, खेळाची तसेच धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात मोठी आवड तर भंडारी नाचाचे उत्तम गायक अशी त्यांची ओळख होती.

सहादेव पांडुरंग खांडेकर यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत विधीसाठी कुणबी समाज उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष व ओबीसी समाज व शेकापचे जेष्ठ नेते शंकरराव म्हसकर,ओबीसी नेते शिवराम महाबळे,वसंतराव मरवडे,नारायणराव धनवी,बाळकृष्ण बामणे,गोवे सरपंच व युवा नेते महेंद्रशेठ पोटफोडे, नरेंद्रशेठ जाधव,देवकान्हे सरपंच वसंत भोईर,भातसई सरपंच गणेश खरीवले,खेळू ढमाळ सह विविध क्षेत्रातील मान्यवर व आदी चिल्हे ग्रामस्थ उपस्थित होते.

कै सहादेव खांडेकर यांच्या 92 वर्षाची कार्यप्रणालीची वाटचाल आणि समाजासाठी केलेले संघर्षचा महामेरू हरपल्याने अंत विधीसाठी उपस्थित असलेले शंकरराव म्हसकर,वसंतराव मरवडे,शिवराम महाबळे,नारायणराव धनवी यांनी यावेळी दुःख अनावर व्यक्त केले.तर त्यांना श्रद्धांजली अर्पण करून तद्नंतर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

सहादेव खांडेकर यांच्या पाश्चात तीन मुले, एक मुलगी , जावई,सुना,पुतणे,नातवंडे असा मोठा खांडेकर परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी गुरुवारी दिनांक 24 नोव्हेंबर व उत्तरकार्य शनिवारी 26नोव्हेंबर 2022 रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार आहे.

Comments

Popular posts from this blog