रायगड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थाअलिबागच्या संचालक पदी बळीराम धनावडे यांची निवड

  कोलाड (श्याम लोखंडे) कर्मचारी वर्गासाठी विश्वसनीय असलेल्या रायगड जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था अलीबाग च्या संचालक पदी रोहा येथील बळीराम मारुती धनावडे ,यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबाबत सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.  

बळीराम धनावडे यांचे मुळ गाव मालसई असुन ते रोहा येथे स्तायिक आहेत. रायगड जिल्हा परिषद  बांधकाम  उपविभाग रोहा कार्यालयात ते कनिष्ट सहाय्य्क पदावर कार्यरत आहेत. अनेक वर्ष शासकीय सेवा करित असताना प्रमाणीक व तत्पर सेवा केली.शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे रायगड जिल्हा परीषद पतसंस्था अलिबाग या सहकार क्षेत्रात अग्रगन्य असलेल्या व पारदर्शक कारभार करित असलेल्या संस्थेत त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड़ करण्यात आली. 

  माझ्यावर जी पदाची जबाबदारी सोपवली त्या पदाला निचित साजेशे काम करनार असल्याचे बळीराम धनावडे यानी सांगितले.

Comments

Popular posts from this blog