रायगडात जात निहाय जनगणनेसाठी ओबीसींची एकजूट,मेळावे,रॅली,सोशल मिडियाद्वारे प्रबोधन,

 पहिल्याच वेळा रायगड मध्ये ओबीसींमध्ये मध्ये प्रचंड एकजुट असल्याचे वातावरण! 

गावागावात, शाळकरी, शेतकरी, कॉलेज तरुणवर्ग, वयोवृद्ध, यांमध्ये रंगते18 नोव्हेंबर मोर्च्याचीच चर्चा! 

कोलाड (श्याम लोखंडे) ओबीसींची जात निहाय जनगणना करत त्यांच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येवु नये यासाठी ओबीसी जनमोर्चाचे राज्य अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे यांचे नेतृत्वाखाली राज्यभरातील ओबीसी पेटून उठला आहे.पालघर, रत्नागिरी येथील यासंदर्भातील मोर्चे राज्य कार्यध्यक्ष चंद्रकांत बावकर व जे.डी.तांडेल, दशरथ ठाकूर यांच्या नियोजनाखाली यशस्वी झाले.शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांचे नेतृत्वाखाली रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा मोर्चा काढण्यात येणार आहे.यासाठी रायगड मधील अठरापगड जातींचे बारा बलुतेदार ओबीसी समाजबांधव एकजुटीने, एकदिलाने एकत्र आले आहेत.आपल्या न्याय्य व हक्काच्या मागण्या तळागाळातील ओबीसी समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी विभागनिहाय मिळावे घेण्यात येत आहेत.भावी पिढीच्या सर्वांगीण हिताचे असणारे ओबीसींचे सर्व प्रश्न युवकांच्या पर्यंत पोहोचावे यासाठी बाईक रॅली , प्रचार फेऱ्यांचे आयोजन करण्यात येत आहे.जिल्हाध्यक्ष सुरेश मगर,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा अक्षरा कदम , युवक जिल्हाध्यक्ष निलेश थोरे यांनी रायगड मधील समस्त ओबीसी बांधवांनी या मोर्चात हजारोंच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन केले आहे.

शिवछत्रपतींच्या स्वराज्यात अठरापगड जातींचे,बाराबलुतेदार आनंदानें रहात होते.छत्रपतींच्या सुराज्यात व त्यानंतर ब्रिटिश पारतंत्र्यातुन स्वातंतत्र्यात आल्यानंतर शेती व आपापले पारंपरिक व्यवसाय करत उदरनिर्वाह करत होते.मात्र कालांतराने सर्वच बाबतीत झालेल्या सामाजिक बदलांत हा ओबीसी समाज मागासलेला राहिला.तो आता मुख्य प्रवाहात येत असतानाच सधन व समृद्ध समाज त्याच्या संविधानाने दिलेल्या आरक्षणावर डल्ला मारण्याचे मनसुबे रचु लागला.आधीच १९३१ च्या जनगणनेनुसार ५२ टक्के आरक्षण देशभरातील हजारो ओबीसींना आहे.यातील मंडल आयोगाने नोंदविलेल्या महाराष्ट्रातील ३६४ पैकी सध्यस्थितीत ३४६ जातींना १९ टक्के आरक्षण मिळत आहे.आजवर ओबीसींच्या मतांवर सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी समाजाची उपेक्षाच केली आहे.ओबीसींची आर्थिक, शैक्षणिक, राजकीय उन्नती व विकास व्हावा यासाठी कोणत्याही सरकारने गांभीर्यपूर्वक काम केले नाही.ओबीसी समाज हा रानावनात, दऱ्याखोऱ्यांतून विभागला गेला असल्यामुळे आजपर्यंत तो कधी एकवटला नाही. त्यामुळे त्याची ताकद कधीही सत्ताधीशांना कळलीच नाही.त्यामुळे ओबीसी जनमोर्चाच्या माध्यमातून प्रदेश अध्यक्ष प्रकाश आण्णा शेंडगे व कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर ओबीसींना संघटित करत आहेत.आज केंद्र व राज्यसरकारे पशुपक्षी, वन्य व पाळीव जनावरांची मोजणी करत आहे. मात्र माणूस असणाऱ्या ओबीसी समाजाची जनगणना १९३१ नंतर आजवर कधीही करण्यात आली नाही. त्यामुळे १३ कोटींच्या महाराष्ट्रात व सव्वाशे कोटींच्या भारतात ओबीसींची निश्चित संख्या किती आहे ही आकडेवारीच समोर येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस ओबीसींचे शैक्षणिक व राजकीय आरक्षणावर गंडांतर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आज ओबीसी समाज आपल्या सामर्थ्याने प्रगती करत आहे मात्र जर त्याला शैक्षणिक, आर्थिक, शासकीय नोकरी यामध्ये त्याला संविधानानुसार मिळालेले आरक्षण अबाधीत राहिल्यास येणाऱ्या भावी पिढ्यांचे भविष्य उज्वल असेल.राजकीय आरक्षण टिकल्यास स्थानिक स्वराज्य संस्था व विधिमंडळात लोकप्रतिनिधित्व सत्तेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवता येतील. यासाठी आता नाही तर कधीच नाही अशी हाक ओबीसी जनमोर्चा सलग्न ओबीसी संघर्ष समन्वय समिती ने रायगड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांना दिली आहे. १८ नोव्हेंबर रोजी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.हा मोर्चा यशस्वी होण्यासाठी मागील महिनाभर मेळावे, बैठका घेत जनजागृती केली जात आहे. जात निहाय जनगणना या प्रमुख मागणी सह समाजाचे सर्व प्रलंबित प्रश्नांवर राज्यशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.रायगड जिल्ह्याच्या डोंगरकपारीत, दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या सर्व ओबीसी बांधवांनी एक दिवस आपल्या समाजासाठी, एक दिवस उद्याच्या पिढीच्या उज्वल भवितव्यासाठी हजारोंच्या संख्येने या मोर्चात शांततामय वातावरणात सामील होत आपला हुंकार राज्य कर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सामील होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष सुरेश मगर व त्यांच्या सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog