रस्त्या तुला शोधू कुठे?

वाट दाखव देवा, सरकला बुद्धी दे देवा?

मुबंई गोवा महामार्ग 12 वर्ष खड्ड्यात हरवला , उद्या कोलाड येथे रायगड पत्रकारांचे साखळी आंदोलन!

 रखडलेले मुंबई गोवा हायवे हा सर्वच राजकीय पक्षांचा पाप जनतेची प्रतिक्रिया... 

कोलाड (श्याम लोखंडे) मुबंई गोवा या राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते इंदापूर कोलाड नागोठणे वडखळ पेण दरम्यानच्या महामार्गावरून प्रवास करतांना प्रवाश्यांचा एकच बोध वाक्य रस्त्या तुला शोधू कुठे? वाट दाखवा देवा,सरकारला बुद्धी दे देवा, अशीच बोलण्याची वेळ आता आली असुन या महामार्गावरून प्रवास करतांना रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे काही ठिकाणी रस्ताच गायब झाला असे चित्र तब्बल 12 वर्ष या मार्गाचे रखडलेले पहावयास मिळत आहे त्यामुळे उद्या सकाळी ठीक 11 वाजता पुन्हा यासाठी रायगड प्रेसक्लब च्या पत्रकारांचा कोलाड येथे साखळी आंदोलन होत आहे.

गेली 12 वर्ष या महामार्गाचे भिजत घोंगड तर निद्रावस्तेत असलेल्या केंद्र सरकारसह राज्य सरकारला पुन्हा जागे करण्यासाठी अथवा मार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी सरकारने जलदगतीने पावले उचलून या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करावे याकरिता आज बुधवारी  9 नोव्हेंबर रोजी कोलाड येथे रायगड प्रेसक्लबच्या वतीने कोलाड येथे मानवी साखळी आंदोलन छेडण्यात येणार आहे याकरता पत्रकारांसह कोकणच्या जनतेनेही सहभागी व्हावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री एस एम देशमुख यांनी समाज माध्यमाद्वारे कोकणच्या जनतेला केले असून अधिकाधिक सामाजिक संस्था व नागरिकांनी केले आहे 

सन 2008 मध्ये रायगडसह कोकणातील पत्रकारांनी मोठया संख्येने या मार्गाचे चौपदरीकरण लवकरात लवकर करण्यात यावे असे एकदिवसीय आंदोलन कशेडी ते पलस्पे या मार्गासाठी लढा देत आंदोलन छेडून आपघात रोखण्यासाठी निवेदनातून मागणी केली तद्नंतर मोठ्या जोमाने शासनाने महामार्गालगच्या जमिनीही शेतकऱ्यांकडून भूसंपादीत केल्या अनेकांचे व्यवसाय व धंदे यात गेले तर काहींची भातशेती गेली शेती जमीन उद्योग व्यवसाय धंदा गेला मात्र गेली बारा वर्षे महामार्गाचे काम मात्र जैसे थे मुंबई गोवा महामार्ग हा तर चक्क प्रवासी वर्गाच्या जीवावरच वेतला असल्याचे दिसून येत आहे.या मार्गावरील इंदापूर, रातवड,तिसे,कोलाड ,पुगाव,खांब, पुगाव, सुकेळी खिंड,कानसई,वाकण,नागोठणे या आमटेम,गडप,वडखळ, पेण दरम्यानच्या महामार्गाच्या मधोमध भले मोठं मोठे खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यात वाहने आदळून मोठे आपघात होत आहेत.तर अनेक वाहनांचे टायर पंम्पचर तर काही वाहनांची तुटा तूट होऊन ना दुरुस्त होत आहेत एवढेच नव्हे तर चक्क दोन दिवसांपूर्वी खड्डा चुकविण्याच्या नादात भला मोठा लोखंडी कोईल वाहतूक करणारा ट्रेलरच जागेवर पलटी झाला परंतु दैव बलवत्तर की मागे पुढे वाहने नसल्याने हा अनर्थ टळला परंतु चालक मात्र गंभीरपणे जखमी झालेच समजले जाते त्यामुळे आता प्रवाशी वर्गाचा जीवही टांगणीला लागला असून वाहतुकीचा ही खोलंबा होत असतांना दिसत असून काहींना कंबरेच्या मणक्याचा आजार होत आहेत.

मुबंई गोवा हा कोकणातून गोव्याकडे जाणारा मुख्य राष्ट्रीय महामार्ग आणि ओळखल्या जाणाऱ्या महामार्गाच्या चौपदरी करणाच्या कामाबाबत ठेकेदाराने तर अक्षरशः खिल्ली उडवली तर प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रणच नसल्याचे समोर आले आहे तर कित्येक वर्षे सदरच्या मार्गाचे काम रखडले आहे कोड्यावधी रुपये यावर खर्च झाले अद्याप किती रुपये खर्च होतील याचा गणित नाही तसेच इंदापूर कोलाड नागोठणे दरम्यानच्या मार्गवर बारमाही खड्डे बुजविण्याची प्रथा सुरू झाली एवढेच नाही तर याकरता ठेकेदारांनी जागोजागी मार्गलगत खड्डी मुरूम टाकूनच ठेवले आहे गणपती काळात तर अक्षरशः हायवे पोलीस व इतर सामाजिक संस्था रस्त्यावर येऊन त्यांनी खड्डे बुजवले सडकेर डांबर टाकली की ती जेमतेम महिनाभर मे महिन्यात नव्याने झालेल्या रस्ता पावसात त्याची अक्षरशः दाणादाण उडाली आहे. कोलाड कडून नागोठणेकडे जाणाऱ्या रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडलेले असल्याने जणू या महामार्गावरील रस्ताच हरवला असल्याचे दिसत असुन रस्त्या तुला शोधू कोठे असाच प्रश्न वाहन चालकांना पडलेला असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनेकदा या मार्गाचे काम येत्या वर्षात पूर्ण केले जाईल अशी आश्वासनाची खैरात केली मात्र जो पहिला पनवेल पलस्पे ते इंदापूर पावसातील चिखलमय प्रवास संपला आता पावसाळा संपताच सदरच्या मार्गावरील धुलिलीचा प्रवास सुरू झाला आहे दररोज वाहतूक कोंडी त्यात प्रदूषित होत असलेली धुळीची कोंडी यात प्रवासी नागरिक हैराण झाले आहेत तर मार्गालगत छोटे मोठे व्यवसाय करणारे व्यवसायिक तर अक्षरशः हतबल झाले आहेत पान टपरी, वडापाव, चहा टपरी, हॉटेल व्यवसाय किराणा व्यवसायिक,यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे तसेच रहवाशी नागरिकांच्या तर अक्षरशः ही धूळ नाका तोंडात घशात जात असल्याने त्यांच्या आरोग्यावर बेतत असल्याने त्यांना विविध आजारांशी सामना करावा लागत आहे.

प्रतिक्रिया :-देशाची वाटचाल अमृत महोत्सव कडून आता शतक महोत्सवा कडे चालली आहे मात्र आजही या देशात नागरिकांना पुरेशी मूलभूत सिविधा मिळत नाहीत मुंबई-गोवा हायवे मार्गावर दररोज होणारे अपघाताच्या दृष्टीने हा महामार्ग चौपदरीकरण व्हावा यासाठी रायगड पत्रकारांनी आंदोलन केले त्याची राज्य सरकार सह केंद्र सरकारने दखल घेत रस्त्याचे काम ही सुरु झाले परंतु या कामाला बारा वर्षे पुर्ण म्हणेज एक तप पुर्ण झाले तरी रस्त्याचे काम पुर्ण तत्वावर नाही या साठी प्रतिवर्षी आराखडा तयार करून दरवर्षं केवळ सात कि.मी. रस्ता केला असता तरी आजवर शंभरहुन अधिक की.मी.अंतर रस्त्याचे काम पुर्ण झाले असते. परंतु नियोजन शुन्य असल्यामुळे हे काम अद्याप ठेकेदारात बारा सुगरणी आणि भोपळा झाला आळणी असे म्हटले जात आहे. उलट करोडो रुपये खर्च करूनही परिस्थिती जैसे थे अशी आहे सडकेवर सरकारने पाण्यासारखा पैसा ओतला मात्र त्याच चीज नसल्याने नागरिक संतप्त होत असून याचा त्रास वाहन चालकांसह प्रवाशी वर्गाला सहन करावा लागत आहे.त्यामुळे या महामार्गाच्या खड्डयांपासुन सुटका केव्हा होणार असा खडा सवाल प्रवाशी वर्गातून नेहमीच केला जात आहे.परंतु यासाठी पुन्हा आज रायगडच्या पत्रकारांना साखळी आंदोलन करावं लागतं हे या राज्याचे या देशाचे दुर्दैवच म्हणावं लागेल यासाठी कोलाड येथे 9 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या साखळी आंदोलनात सर्व नाहकांनी सहभागी होण्यासाठी आवाहन केले  असून नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे असे आवाहन सर्व सामान्य जनतेला केले आहे.सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉ मंगेश सानप कोलाड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog