सामाजिक कार्यकर्ते शरद कळमकर यांच्या कुटूंबियांच्या वतीने षष्टब्दी मोठ्या उत्साहात साजरी

खांब(नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक तथा राजकीय क्षेत्रात नेहमी अग्रेसर असलेले पुगाव गावचे सुपुत्र शरद नारायण कळमकर यांची त्यांच्या कुटूंबियांच्या व समस्त कळमकर परिवार यांच्या वतीने षष्टब्दी मोठ्या उत्साह वातावरणात साजरी करत त्यांनी एकसष्ट वर्षात पदार्पण केले आहे .

शरद नारायण कळमकर म्हणजे पुगाव गावातील लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचे लाडके 'भाऊ' या नावानेच अशी त्यांची ओळख आहे त्यांचा स्वभाव शांत आणि सर्वांची मनमिळाऊ प्रेमाने आदराने वागतात कळमकर कुटुंबाचा व परिवाराचा मोठा आधारस्तंभ व मार्गदर्शक समजले जातात आज त्यांचे वय ६० वर्ष पूर्ण झाले असल्याने त्यांच्या कुटूंबानी त्यांचा वाढदिवस मोठ्या आनंदाने व उत्साहात साजरा केला.

शरदराव कळमकर यांनी आपल्या जीवनात अनेक चढ उतार पाहिले आई वडिलांच्या आशीर्वादाने उच्च शिक्षण घेत चांगल्या शिक्षणाच्या जोरावर रोहा धाटाव येथील औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात उच्च पदीस्थ म्हणून अकाउंट खात्याचे उत्तमरीत्या कामकाज पाहिले कारखान्यात सर्वांच्यात मिळून मिसळून राहून तसेच वरिष्ठांची मर्जीनुसार जवळपास 37 ते 38 वर्ष उत्तम प्रकारे त्या कारखान्यात सेवा करत सेवा निवृत्त झाले आपले कुटूंब सांभाळले तसेच त्यांना त्यांच्या पत्नीची उत्तम साथ लाभल्याने हम दो हमारे दो असा सुखी परिवार पत्नी देखील शिक्षिका असल्याने तसेच ते उच्च शिक्षित असल्याने मुलांना देखील उच्च शिक्षित शिक्षण दिले कुटूंबात एकत्रित राहून नातवंडे यांना देखील उत्तम प्रकारे प्रेम देत सामाजिक बांधिलकी म्हणून समाजात सामाजिक व शैक्षणिक तसेच राजकीय क्षेत्रात उत्तम प्रकारे कार्य करत करत असलेले शरद (भाऊ ) यांना त्यांच्या कुटूंबियांनी सह परिवार यांनी मोठ्या उत्साहाने त्यांची षष्टब्दी वाढदिवस आनंदाने साजरा केला.

सर्वांच्या मार्जितले आणि कळमकर परिवाराचे आधारस्तंभ "भाऊ " यांच्या खास वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या जीवनशैली आधारित त्यांच्या धर्मपत्नी सौ सीमा कळमकर (शिक्षिका) यांनी या प्रसंगी फार चांगले विचार मांडले श्री .श्रीकृपावंत , श्रीस्वरूप ,

श.शरद नाव आपुले सार्थ सुस्वभाव हाच जीवनार्थ,

 र. रत्न तुम्ही असती समाजात रमती सदा तुम्ही जनमानसात,

 द.दर्पणापरी तुमची प्रतिमा आरसपाणी दर्शनात तुम्ही सदैव कथती अमृतवाणी ,

ना. नाव तुमचे घेती सर्व अत्यंत आदराने नाही कुणाला दुखावलेत कृती अन शब्दाने,

रा. राग , लोभ ,मद ना मत्सर बाळगला कधी जोडलीत नाती आपुलकीची राहणी साधी , 

य .यज्ञातील पवित्र अग्निपरी आपुले जीवन समर्पित सदा समाजात राहून ,

ण. नम्रता सदा आपल्या वर्तनात नभापरी अभाळमाया तुमच्या हृदयात ,

क. कर्तव्यात कधीही नाही केलात कसूर कर्मात आपुल्या असती आनंदाचे सूर ,

ळ .लक्ष लक्ष शुभेच्छा तुम्हास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष ज्योतीने ओवाळीतो पंचाआरतीच्या,

म .मन तन धन अर्पूनी केलात आयुष्य समर्पण मनमंदिरात मूर्ती स्थापून करितो आपणास पूजा वंदन ,

र. रहावे आनंदी उत्साही निरोगी तुम्ही सुदैवी रहावा षष्टब्दीनंतर शतकोत्तर आशीर्वाद दैवी ,

आशा सुंदरमय शब्दांतून त्यांच्या पत्नीने केलेले वर्णन यांनी उपस्थित सारे गेले भारावून असा भाऊंच्या जीवनातील प्रवास आणि त्यांची साजरी केलेली षष्टब्दी वाढदिवस कळमकर परिवाराने मोठ्या आनंददायी वातावरणात केला करत त्यांचे बंधू संदीप कळमकर व नितिन कळमकर तसेच सौ रचना कळमकर यांनी 'भाऊ' यांच्या जीवनशैलीविषयीआनंददायी उत्साहात मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog