गोरेगाव पोलीस ठाण्याच्या गणरायाचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन!
कोल्हापूरच्या छावा मर्दानी आखाड्याने जिंकली गोरेगावकरांची मने!
रायगड (भिवा पवार) रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलीस ठाण्याच्या गणरायाला शनिवार खालूबाजा,लेझीम, ढोल यांच्या गजरात मंगलमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला.
समाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पडत असताना आपल्यालाही धार्मिक भावना व कर्तव्य असतात त्या पार पाडायचे असतात असा उदात्त दृष्टीकोन समोर ठेवून गोरेगाव पोलीस स्टेशन तर्फे सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला. आला दहा दिवस गणरायाची यथोचित पूजा आरती सत्यनारायणाची महापूजा अशा माध्यमातून श्रीगणेशाची पूजन अर्चन करण्यात आले.
रथामध्ये बाप्पांना स्थानपन्न करून खालुबाज्याच्या तालावर लेझीम खेळ भव्य मिरवणुकीने बाप्पांना गोरेगावच्या विष्णू तलावात भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण नावलेंसह सर्व अधिकारी कर्मचारी आणि त्यांचा परिवार तसेच गोरेगावचे नागरिक सहभागी झाले होते.
दरवर्षी आपली कर्तव्य पार पडत असताना एक सामाजिक बांधिलकी म्हणून विविध समाजपयोगी उपक्रम गोरेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्रीकृष्ण संभाजी नावले आपल्या दूरदृष्टीने करत असतात त्यांच्या या विविध उपक्रमाला त्यांचे सर्व सहकारी मोठ्या उत्साहाने पाठिंबा देत असतात.
यावर्षी श्रीगणरायाच्या विसर्जनाचे मिरवणुकीत अखिल गोरेगावकरांना यांना उपयुक्त ठरावेत म्हूणन गोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छवा मर्दानी आखाडा कोल्हापूर यांनी गोरेगावच्या जिजामाता प्राणंगणात चित्त थरारक प्रात्यक्षिके करून दाखविली. यामध्ये विविध यामध्ये लाठीकाठी, बनोटी, तलवारबाजी भाला चढाई, तलवार दांडपट्टा चालविणे, डोक्यावर लिंबू कापणे,केळे कापणे, नारळ फोडणे, या सर्व कृतीतून स्वतःच्या संरक्षणाबरोबर दुसऱ्याचे संरक्षण कसे करावे असा दुहेरी उद्देश याद्वारे साधला गेला जातो हे दाखवून दिले.
सातत्यपूर्ण सराव, व्यासंग, समय सुचकता वारसा, हातोटी अशा सर्व व्यासंग वृत्तीने हे साध्य होते असे आखाड्याचे गुरुजी विशाल निकम यांनी सांगितले. कोल्हापूरच्या छावा मर्दानी या आखाड्यामध्ये चंद्रकांत पार्लेकर विशाल निकम, स्वप्नील शेळके, अश्विनी शेंडगे, ऐश्वर्या गळवे, वैशाली पाटील, प्रज्ञा उन्हाळे, संचिता इंगळे, श्रावणी सुतार, वैभव उन्हाळे, सारंग कणदाळे, शौर्य उन्हाळे, यांनी विविध प्रकारचे आखाड्याचे चित्त थरारक प्रकार सादर करून गोरेगावकरांची मने जिंकली. यामध्ये वयाच्या पाच वर्षापर्यंतच्या बालिका ते 85 वर्षाच्या आजोबांनी विविध प्रकारचे प्रात्यक्षिक सादर केली. काही स्थानिक कलाकारांनी आपले कौशल्य बनोटीचे सहाय्याने सादर केले इतर वेळी आपल्या कामातून व्यस्त असणारे पोलीस यावेळी मात्र देहभान विसरून गणरायाच्या विसर्जनात मनसोक्त नृत्य करत होते.
Comments
Post a Comment