श्री क्षेत्रपाल मित्रमंडळ पुई तर्फे ३७ जेष्ठ नागरिकांचा सत्कार, गणेश उत्सवात अनोखा उपक्रम!
गोवे-कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील पुई गावातील श्री. क्षेत्रपाल मित्र मंडळातर्फे सार्वजनिक गणेश उत्सवाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले जात असून या वर्षी यानिमित्ताने पुई येथील ३७ जेष्ठ नागरिकांचा सत्कार करुन या तरुणांनी अनोखा उपक्रम राबविला आहे.
सार्वजनिक गणेश उत्सवाचे संस्थापक अनंत रामू सानप यांनी गावातील तरुणांमध्ये एकोपा निर्माण होण्याच्या उद्देशाने श्री. क्षेत्रपाल मित्रमंडळाची स्थापना करून सार्वजनिक गणेश उत्सव सुरु केला त्याला यावर्षी १५ वर्षे पुर्ण झाली असून हे मित्र मंडळ दरवर्षी विविध उपक्रम राबवीत आहे.यावर्षी ३७ जेष्ठ नागरिकांना गांधी टोपी व टॉयल भेट देऊन सत्कार करण्यात आला.या उपक्रमात मार्गदर्शन करतांना नायब तहसीलदार मोते,सामाजिक कार्यकर्ते शब्बीर शेठ सय्यद,तंटामुक्ती अध्यक्ष मधुकर दिसले व इतर जेष्ठ नागरिकांनी या उपक्रमाबद्दल श्री.क्षेत्रपाल मित्रमंडळाचे कौतुक केले.
या सर्व उपक्रम राबविण्यासाठी मंडळाचे संस्थापक अनंत कदम, अध्यक्ष विठ्ठल पवार,सचिव हरिचंद्र कदम,उत्सव कमेटी अध्यक्ष लक्ष्मण कदम,सुरज साळवी,उपाध्यक्ष सचिन लहाने,सदस्य अजित लहाने,अनिल लहाने, विनायक दिवेकर,संदीप शिर्के, रितेश शिर्के,किसन महाडिक, उल्हास कुचेकर,शरद दिसले,नथुराम दिवेकर,केतन मोहिते, समिर पडवळ,राहुल चिनके, संदीप सानप,हरेश महाडिक,निखिल कदम, दिनकर सानप व सर्व सदस्य मेहनत घेत असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सागर सानप यांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रवण कदम यांनी मानले.
Comments
Post a Comment