कालव्याच्या पाणी प्रश्न आंदोलन 'अल्टीमेटम'ची प्रशासनाने घेतली दखल, पाणी प्रश्न सुटणार की पाणी पेटणार?

 जिल्ह्यात चर्चा!

ग्रामस्थांचे निवेदन तातडीच्या बैठकांवर बैठका!

खांब (नंदकुमार कळमकर) कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी किल्ला ते निवी विभाग कालव्याला आठदहा वर्ष पाणी सोडत नसल्याने ग्रामस्थांचे प्रचंड हाल झालेत. उन्हाळ्यात पाण्याची भीषणता जाणवत आहे. भात, भाजीपाला, पूरक शेतीला पाणी नाही. गुरढोरे, पशु पाण्यासाठी ऐन तडफडत असतात. गावे दुष्काळाने होरपळून गेलीत. दुसरीकडे पाटबंधारेचे पाणी तालुका बाहेरील कंपन्यांना विकले जाते. धनधांडग्यांच्या राफ्टींगला सोडले जाते. हा राग ग्रामस्थांत असतानाच विभागातील बळीराजाला पाणी नाही म्हणून वाशी , लांढर, बोरघर, तळाघर, निवी हद्दीतील शेतीकरी, ग्रामस्थ पाण्यासाठी आक्रमक झाले. रविवारी समन्वय समितीच्या बैठकीत ग्रामस्थ पाण्यासाठी प्रचंड संतप्त झाले. येत्या पंधरा दिवसात संबंधीत प्रशासनाने पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन न दिल्यास मोठे आंदोलन उभे करू याच ग्रामस्थांच्या अल्टिमेटचा अखेर सर्वच प्रशासनाने दखल घेतली. बुधवारी कालव्याच्या पाण्याबाबत तहसीलदार रोहा, रायगड पाटबंधारे विभागाच्या कार्य अभियंता दिपेश्री राजभोज यांना विभागीय ग्रामस्थांनी निवेदन दिले. कालव्याच्या स्थितीचा आढावा घेत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांजवळ चर्चा केली. कालव्याच्या पाण्याबाबत पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांसमवेत तातडीने बैठक घेण्याचे थेट आश्वासन तहसीलदार कविता जाधव यांनी दिले. तर तुम्हा ग्रामस्थांची पाण्यासाठीची आक्रमकता समजू शकते, कालव्याच्या कामांबाबत लगेचच आढावा घेतला जाईल, पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्याचे स्पष्ट सुतोवाय रायगड पाटबंधारेच्या मुख्य कार्य अभियंता दीपेश्री राजभोज यांनी दिल्याने विभागीय ग्रामस्थांनी तुर्तास समाधान व्यक्त केले. दरम्यान, कालव्याला पाणी सोडण्याचे पंधरा दिवसात लेखी. आश्वासन न दिल्यास प्रशासनाविरोधात विभागीय शेकडो ग्रामस्थ, महिला आंदोलन उभे करतील, असा थेट पुनर्रउच्चार प्रशासन अधिकाऱ्यांसमोर ग्रामस्थांनी केल्याने कालव्याचा पाणी प्रश्न तातडीने सुटणार की पाणी पेटणार ? याची चर्चा संबंध जिल्ह्यात सुरु झाली आहे.

कोलाड पाटबंधारेच्या आंबेवाडी ते निवी विभागीय कालव्याला पाणी का सोडले जात नाही, हे अनेक वर्ष आश्चर्य बनून राहिले आहे. त्याबाबत नकारघंटाही सुरू आहे. त्यावर आम्हाला कालव्याची दुरुस्ती करून द्या. त्यानंतर वर्षभरात कालव्याला पूर्वपारप्रमाणे पाणी सोडू असे पाटबंधारे प्रशासनाने आश्वासीत केले होते. मात्र याच काळात प्रशासनाने नको तिथे मोऱ्या बांधल्या, काँक्रिटीकरण केले, मात्र आजगायत कालव्याला पाणी सोडले नाही. बळीराजाच्या हक्काचे असलेले हेच पाणी बाहेरील कंपन्यांना विकले जात आहे. पाणी धनधांडग्यांच्या राफ्टींगला सोडून नदीतून वाया घालवले जात आहे, असा आरोप ग्रामस्थांनी वारंवार केला. विभागात कालव्याचे पाणी नसल्याने काय भीषणता आहे, हे जिल्ह्यात सर्वश्रुत आहे. यावर्षी कालव्याचे पाणी आमच्या हक्काचे आहे. आम्ही ते घेणारच असा निर्धार विभागीय ग्रामस्थांनी केला आणि प्रशासनाला खडबडून जागे केले. बुधवारी तहसील व पाटबंधारे प्रशासनाला कालव्याच्या पाण्याबाबत निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थ विठ्ठल मोरे, सरपंच मनोज कलम्बे, तुकाराम भगत, राकेश बामगुडे, संदेश मोरे, राजेंद्र जाधव, सागर भगत, रवी मोरे, किशोर कांबळे, सुरेश साळवी, संजय भगत व विभागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कालव्याच्या पाण्याबाबत वाशी ते निवी विभाग ग्रामस्थांनी उठाव करण्याचा निर्धार केल्याने संबधीत प्रशासन अक्षरशः भानावर आले. पाणी प्रश्न आम्ही समजू शकतो, त्यादृष्टीने आम्ही तातडीने कार्यवाही करू असे स्पष्ट सुतोवाच तहसील मुख्यतः पाटबंधारे प्रशासनाने दिले. रायगड पाटबंधारेच्या मुख्य कार्य अभियंता दिपश्री राजभोज यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या. कालवा कुठे लिकेज आहे, कुठे गाळ साचला आहे, यावर मार्ग काढण्याची जबाबदारी तुमची आहे. डिसेंबर अखेर आम्हाला कालव्याचे पाणी हवे, अशी आक्रमकता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यावर कालव्याच्या दुरुस्ती, साफसफाई कामाचे तातडीने आढावा घेण्याचे संबधीत अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत, कालव्याला पाणी सोडण्याबाबत कार्यवाही केली जाईल असे ठोस आश्वासन कार्य. अभियंता राजभोज यांनी दिले तर तहसीलदार कविता जाधव यांनीही लगेचच कालव्याच्या पाण्यासंदर्भात बैठक घेणार असल्याचे उपस्थित ग्रामस्थांना सांगितले. दरम्यान, विभागीय कालव्याच्या पाण्यासंदर्भात खा. सुनील तटकरे यांनी गुरुवारी सायंकाळी सुतारवाडी येथे अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलाविली आहे, तशी माहिती पाणी समन्वय समितीला देण्यात आली. त्यामुळे आता पाणी प्रश्न सुटणार की ग्रामस्थांच्या घोषीत आंदोलनाच्या इशाऱ्यातून पाणी पेटणार ? हे लवकर समोर येणार आहे.

Comments

Popular posts from this blog