शिक्षणप्रेमी प्रभाकर शिर्के यांच्या विद्यमाने वडघर परिसरात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
माणगाव (प्रतिनिधी) आपण ज्या मातेच्या उदरी जन्म घेतला तिने केलेल्या संस्कारातून घडलेले प्रभाकर शिर्के. तसेच ज्या भूमीत जन्म घेतला त्या समाजबांधवांविषयी, विद्यार्थ्यांविषयी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकी म्हणून गरीब गरजू व सर्वसामान्य परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे ,त्यांचे शिक्षण थांबू नये यासाठी शिलिम बौद्धवाडी गावचे रहिवासी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच शिक्षणप्रेमी श्री.प्रभाकरजी शिर्के यांच्या सरस्वती विद्या मंदिर वडघर (मुद्रे) या विद्यालयास तसेच पळसप, हेदमलई, वडघर, परिसरातील विद्यार्थ्यांना 300 विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच मांजरोने देऊळवाडी आदिवासी वाडीवर जाऊन सुद्धा आदिवासी विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले आहे.
माणगाव तालुक्यातील मांजरोने जवळील वडघर परिसर हा ग्रामीण भाग असून या परिसरातील अनेक शेतकरी, आदिवासी,व अनेक गरीब कुटुंबाची मुले शिक्षण घेत असतात या ग्रामीण भागामध्ये आपल्या परिसरातील उदयोन्मुख शाळेसाठी वहयांचे दान करतांना आपणास आनंद होतो कारण आम्ही लहान असताना जे गरीबीचे चटके सहन केले ज्या हाल अपेष्टा सहन केल्या त्या आताच्या पिढीला भोगायला लागू नये ,त्यांनी शिकावे ,सुशिक्षित, उच्चशिक्षित व्हावे हा मोठा भाव त्यांच्या मनात आहे.
शिक्षणामध्ये अर्थिक परिस्थितीची अडचण होत असेल,शिक्षण थांबत असेल तर ते तसे होऊ नये यासाठी आपण शैक्षणिक साहित्यातील वह्या हा मोठा खर्च करून ती गरज भागवली तर विदयार्थ्यांच्या शिक्षणास हातभार लागेल असा मनोदय श्री प्रभाकर शिर्केयांचा असल्यामुळे परिसरातील 300 विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम केला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपला सर्व समाज शिक्षित व्हावा, संघटीत व्हावा व संघर्ष करावा यासाठी तत्कालीन काळात संकल्प केला होता हा संकल्प पूर्ततेसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करुन देत आहोत असे भाव श्री.प्रभाकर शिर्के यांनी आमच्या प्रस्तुत प्रतिनीधींशी बोलताना व्यक्त केले. या उपक्रमाचे वडघर परिसरामध्ये स्वागत होत असून शिक्षण प्रेमी प्रभाकर शिर्के यांच्या उपक्रमाबद्दल वडघर परिसरातून प्रभाकर शिर्के यांचे अभिनंदन केले जात आहे.




Comments
Post a Comment