कोलाड विभागातील २५४ जेष्ठा गौरी,११६३ गणपती बाप्पांचं जयघोषात विसर्जन

खांब(नंदकुमार कळमकर ) : एक दोन तीन चार गणपती बाप्पाचा जयजयकार, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात आला रे आला गणपती आला, गणपती चालले गावाला चैन पडे ना आम्हाला, उंदीर मामा की जय, आशा भावपूर्ण जयघोषात भक्तिमय व मंगलमय वातावरणात कोलाड परिसरातील भक्तगणांनी २५४ जेष्ठा गौरी व ११६३ आपल्या लाडक्या बाप्पांना यावेळी भावपूर्ण निरोप देण्यात आला.

कोलाड परिसर व कोलाड विभागातील ग्रामीण भागातील नागरिकांनी गणपतीपूर्वीच वीसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव व नदी परिसर स्वच्छता करण्यात आली होती. दुपारी चार वाजल्यानंतर वाजत गाजत,तर काही गुलाल उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात श्री गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी उसळली होती. एका मागुन एक घरगुती गणपती विसर्जनासाठी आपल्या परिसरातील नदी किनारी व तलाव ठिकाणी निघाले होते. तत्पुर्वी कोलाड पोलिस प्रशासनाच्या वतीने दुपारपासूनच कोलाड विसर्जन स्थळांकडे जाणारे मार्ग मोकळे रहावेत यासाठी गस्त घालण्यात आली.

भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत परिसरातील तलाव, कुंडलिका नदीपात्र व महीसदरा किनारी भावपुर्ण आणि भक्तीमय वातावरणात गणरायांचे विसर्जन केले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी पोलिसांनी विसर्जन मार्गावर आणि नदी किनारी तसेच मुबंई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुकेळी खिंड ते भुवन पर्यंत चोख बंदोबस्त ठेवले होते. कोलाड पोलीस स्टेशन हद्दीतील हद्दीतील व परिसरातील दिडदिवसांच्या एकुण ७९१ बाप्पांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहीती कोलाड पोलिस निरीक्षक सुभाष जाधव यांनी दिली.

परिसरात दीड दिवसाचे गणपती खाजगी ७९१, पाच दिवसाचे खाजगी ११६३ व गौरी २५४ सात दिवसाचे खाजगी ०४ तर दहा दिवसाचे सार्व. १० खाजगी ३८ असेंबएकुण सार्व १० व खाजगी घरगुती ब१९९६ गौरी २५४ तसेच कोलाड पोलिस ठाणे हद्दीतील गणेश विसर्जनाची माहिती गणेश उत्सव अनुषंगाने कोलाड पोलिस ठाणे हद्दीत पुरविण्यात आलेला बंदोबस्त खालील प्रमाणे सोलापूर pts ०३ नप्र पोशी,नाशिक येथुन ०१ परी पोसई, DSP कडून ०७ होमगार्डमहामार्ग टप:- खांब गाव २अमलदार म्हसद्रा ब्रिज ०४ अमलदार ०२ होमगार्ड सुकेळी ते भुवन पेट्रोलिंग ०२ अमलदार,असे एकुण ०८ अमलदार व २ होमगार्ड जिल्हा वाहतूक शखा अलिबाग यांचे कडून पुरविण्यात आलेला बंदोबस्त पुई येथील महिसदरा ब्रीज एक श्रेणी पोस ई व ५ वाहतूक अमलदार कोलाड नाका येथे एक पोस्ई व २ वाहतूक अंमलदार, तसेच वायरलेस ड्युटी करीता एक मपोशि व रात्रौ एक अमलदार एकूण २ पोस्ई ०७ अमलदार असे वरीलप्रमाणे बंदोबस्त पुरविण्यात आले असल्याची माहिती कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.

Comments

Popular posts from this blog