कोलाड-रोहा मार्गावर इर्टिगा कार दुचाकी स्वारावर धडकली, तीन जण गंभीर जखमी

    गोवे-कोलाड (विश्वास निकम) कोलाड रोहा मार्गावरील पाले बु .हद्दीतील माशन भूमिसमोर बुधवार दि.३१ऑगस्ट रोजी दुपारी ३.१० वाजण्याच्या सुमारास इर्टिगा कार क्र.एम एच ०६सीडी १६१२ही कार रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता विरुद्ध साईडला जोरदार वेगाने जात असताना रोहा बाजूकडील येणारी पॅशन प्रो.मोटार सायकल क्र.एम एच ४७/एम ४८८१हिस समोरून धडक दिल्याने यातील मोटार चालक स्वार व त्याचे दोन साथीदार यांना गंभीर दुखापत झाली असून सदर दुखापत ग्रस्थांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

  पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार कोलाड कडून रोहा कडे जाणाऱ्या दिपक दत्तात्रय नाईक आदर्शनगर,भुनेश्वर, रोहा यांच्या ताब्यातील इर्टिगा कार हिने रॉंग साईडला जाऊन रोहा कडून येणाऱ्या मोटार सायकलला धडक देऊन अपघात नरेश यशवंत कडव(वय ३६),गणेश गोविंद कडव (वय ३८), विनोद सखाराम दहिंबेकर (वय ४०)हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असून अधिक तपास परी पोसइ श्री फडतरे व पोहवा आर आर राऊळ करीत आहेत.

Comments

Popular posts from this blog