गौरी गणपती उत्सवात खेळ रंगला पैठणीचा,पुगाव येथील पैठणीच्या खेळात मानकरी ठरल्या माहेरवाशीण सौ. रोशनी मोरे

खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे गौरी गणपती उत्सवात खेळ रंगला पैठणीचा याला सासरवासीन माहेरवासीन महिलांनी भरभरून प्रतिसाद देत तसेच रंगतदार खेळात भाग घेत चढाओढीच्या खेळात अखेर पैठणीच्या विजेत्या ठरल्या माहेरवासीन सौ रोशनी कल्पेश मोरे तर उपविजेत्या ठरल्या माहेरवासीन सौ भारती सुधीर गोळे,येथील शिवतेज मित्र मंडळ व जय बजरंग मित्र मंडळ पुगाव यांच्या संयुक्त विद्यमाने व गणेशोत्सव निमित्ताने, महिलांसाठी विशेष खेळ पैठणीचा कार्यक्रम येथील शिव छत्रपती चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यात बहुसंख्येने महिलांनी सहभाग नोंदवला विशेषतः विविध खेळ खेळत महिलांनी भरभरून प्रतिसाद देत आनंद लुटला तर पैठणीच्या विजेत्या व उपविजेत्या ठरल्या त्या माहेरवासीन त्यामुळे शेवटी या रंगतदार कार्यक्रमाच्या खेळ पैठणीच्या विजेत्या व मानकरी ठरल्या विजेत्यांना सौ रचना कळमकर यांच्या हस्ते सौ रोशनी कल्पेश मोरे,यांना पैठणी देऊन सत्कार करण्यात आला तर उपविजेत्या सौ भारती सुधीर गोळे यांना सोन्याची नथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर उत्साह आणि आनंदायी वातावरनात विजेत्या ठरलेल्या या महिलांचे त्यांच्या कुटूंबियांनी मोठे कौतुक केले व अति उत्साह म्हणून पतीने त्यांना उचलून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच या खेळात सहभागी झालेल्या महिलांना देखील भेट वस्तू देत त्यांचे या मंडळाच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

उत्स्फूर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमात जेष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते नारायणराव धनवी,युवा सामाजिक कार्यकर्ते  प्रमोद म्हसकर, सुधीर शेळके, घनश्याम बागुल, अनंत म्हसकर, गणेश म्हसकर,ग्राम पंचायत सरपंच सौ नेहा म्हसकर बबन म्हसकर, राम कळमकर, गोरखनाथ देवकर, राजेश देशमुख, अशोक झोलगे, नंदकुमार झोलगे,मयूर धूपकर, विनोद धनवी,मधुकर कलमकर, ललित म्हसकर, राजेंद्र निळेकर, रमेश देशमुख ,मान्यवर व आदी महिला ग्रामस्थ नागरिक तसेच युवक युवती बहुसंख्येने उपस्थित होते.मंडळांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला युवा सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्या कडून पैठणी देण्यात आली तर  राजेंद्र धनवी यांच्या कडून सोन्याची नथ देण्यात आली या कार्यक्रमाचे संचालन निनाद यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवतेज मित्र मंडळ व जय बजरंग मित्र मंडळ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog