तटकरे कुटूंबियांची वचनपूर्तता पुगाव गावाला भरघोस निधींचा पत्र आमदार अनिकेत तटकरेंनी केला ग्रामस्थांना सुपूर्द

खांब (नंदकुमार कळमकर ) रोहा तालुक्यातील एकसंघ एकनिष्ट असलेल्या पुगाव ग्रामस्थांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे यांच्याकडे गावच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच गावात सुसज्ज नळपाणी पुरवठा व सामाजिक सभागृहाची मागणी केली होती या मागणीला तटकरे कुटूंबियांनी दिलेल्या वचनाचे तंतोतंत पालन करत केलेल्या मागणीला खासदार तटकरे साहेब यांनी दुजोरा देत आमदार तथा रायगडच्या माजी पालकमंत्री कु आदितीताई तटकरे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या विशेष प्रयत्नातून येथील ग्रामस्थ महिला नागरिकांना नळपाणी योजनेचा व गावातील सामाजिक सभागृहाचा मंजुरी आशा भरघोस निधीपत्र आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी ग्रामस्थांना सुपूर्द केले.

रविवार दिनांक ११/०९/२०२२ रोजी पुगाव गावातील जे काही मूलभूत प्रश्न होते त्या संदर्भात दोन्ही गावातील ग्रामस्थ महिला वर्ग यांनी एकत्रित येऊन आमदार अनिकेत भाई तटकरे तसेच आमदार तथा मा.पालकमंत्री अदितीताई तटकरे यांची भेट घेत आपल्या गावातील विविध विकासासाठी मूलभूत प्रश्न मांडले असता गावातील पाण्यासंदर्भातील जवळ जवळ १,४३,०००००/-(एक कोटी त्रैचाळीस लाख) निधीचा पत्रक दिला (ओवर कॉटर) व गावातील सामाजिक सभागृहासाठी अधिक निधीपत्र देत गेली चार वर्ष येथील शेतकऱ्यांची रखडलेल्या आर सी एफ कंपनी कडून शेतीची मिळणारी नुकसानभरपाई या संदर्भात सर्व ग्रामस्थांनी व्यथा यावेळी दोन्ही आमदारांना सांगितले त्यावर गेली वर्षभर या गोष्टीचा पाठपुरावा करून येत्या नवरात्र उस्तवापूर्वी आपण आर सी एफ कडून शेतकऱ्यांना मिळणारी ही नुकसानभरपाई वाटप करण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करीत करणार असल्याचे आश्वासन देत याबत अधिक ठोस भूमिका घेत यापुढे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळत असलेल्या ८०% रक्कम व अधिक ही 100% रक्कम येथील शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी मागणी करणार असल्याचे उपस्थित ग्रामस्थांसमावेत सांगितले 

तसेच या प्रसंगी ग्रामस्थांनी अधिक गाऱ्हाणे गात येथील गावठाण प्लॉट संदर्भात असलेल्या अडचणी बद्दल माहिती दिली त्यावर तातकाल संबधित आधिकारी वर्गांशी दूरध्वनीवरून संपर्क साधूत येथील ग्रामस्थांना लवकरात लवकर हे प्लॉट धारकांना ताब्यात देण्याचे सांगितले तसेच सामाजिक सभागृहात करिता रु.५ लाख (पाच लाख रुपये मात्र) मंजूरी पत्रक देखील यावेळी युवानेते आमदार अनिकेतभाई तटकरे यांनी पुगाव ग्रामस्थांना दिला 

यावेळी गावातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नारायणराव धनवी, युवा कार्यकर्ते प्रमोद म्हसकर, राम धुपकर उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व सदस्या,ग्रामस्थ महिला वर्ग तसेच तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog