जिल्ह्यात 15 एप्रिल ते 23 ऑगस्ट या कालावधीत 14 लाख 97 हजार 341 शिवभोजन थाळींचे मोफत वितरण,
रायगड (विशेष प्रतिनिधी ) : कोविड-19 दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जाहीर आर्थिक मदतीच्या अनुषंगाने राज्यात शिवभोजन थाळी मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या योजनेंतर्गत दि. 15 एप्रिल 2021 पासून दि.23 ऑगस्ट 2021 पर्यंत रायगड जिल्ह्यातील पंधरा तालुक्यात कार्यरत असलेल्या एकूण 91 शिवभोजन केंद्रामार्फत मोफत वितरीत करण्यात आलेल्या शिवभोजन थाळींची संख्या 14 लाख 97 हजार 341 असून दि.23 ऑगस्ट 2021 रोजी मोफत वितरीत करण्यात आलेल्या शिवभोजन थाळींची संख्या 11 हजार 485 आहे, तसेच जुलै महिन्यात महाड आणि पोलादपूर तालुक्यात आलेल्या महापुरात पूरग्रस्तांसाठी शिवभोजन थाळींचे वाटप करण्यात आले होते. हे वाटप दि. 14 सप्टेंबर 2021 पर्यंत नि:शुल्क सुरु ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके दिली आहे.
Comments
Post a Comment