कामत प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी बनविल्या   आकर्षक राख्या, साजरा केला रक्षाबंधन सण 



कोलाड (श्याम लोखंडे
रायगड जिल्हा परिषद शाळा कामथ ता. रोहा ,जि. रायगड येथील शाळेत मुलींनी स्व निर्मिती व सर्जनशीलता दाखवत रंगबेरंगी लोकर , मनी , कुंदन इ. विविध साहित्य वापरून राख्या बनवत शाळेत केला रक्षाबंधन साजरा .

शाळेतील मुख्याध्यापक सौ रेशमा प्रशांत वाघचौरे सहशिक्षिका श्रीमती अंजली अरविंद गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली मुलींनी सर्जनशीलता दाखवत स्वतः आनंदाने राख्या बनवल्या तसेच मुलांना त्यांच्या आवडीच्या रंगाच्या राख्या बांधत शाळेमध्ये उत्साहात राखी पौर्णिमा साजरी करण्यात आली



मुलांचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थ श्री .राजाराम कोंडे (अण्णा) ,श्री विश्वास मेने ,सुमती निळेकर ,सविता निळेकर , सौ.सेजल सुतार, सौ. विद्या निळेकर आणि शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ संगीता शिर्के उपस्थित होत्या. सर्वांनी मुलींचे भरभरून कौतूक केले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .

Comments

Popular posts from this blog