रोहा वनविभागाची धडक कारवाई;अंदाजे सहा लाख रुपयांची खैराची चोरी  पकडण्यात वनविभागाला यश,

कोलाड (श्याम लोखंडे ) दि.२७ आॕगस्ट २०२१ रोजी उपवनसंरक्षक रोहा अप्पासाहेब निकत व सहाय्यक वनसंरक्षक रोहा विश्वजित जाधव यांच्या मार्गदर्शनखाली हि धडक कारवाई करण्यात आली.

सदर मिळालेल्या गुप्त बातमी वरून वनक्षेत्रपाल संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन रोहा कांबळी,वनरक्षक फिरते पथक रोहा अजिंक्य कदम,वनरक्षक शेणवई .तेजस नरे,वनरक्षक मेढा,योगेश देशमुख वनरक्षक कुशेडे, किशोर वाघमारे,वनपाल माणगाव,गायकवाड व राऊंड स्टाफ माणगाव यांनी मौजे विघवली फाटा मुंबई गोवा महामार्गावर मोरया धाब्याजवळ टाटा ट्रक क्रमांक.MH.16.Q.7151 तपासले असता त्यामध्ये अवैध वृक्ष तोडीचा विनापरवाना वाहतूक केलेलं खैर सोलिव मालं ९.२२५ घमी किंमत १५,५३०/- व ट्रक अंदाजे किंमत रुपये पाच लाख मात्र, एकूण ५,१५,५३०/- इतका मुद्देमाल व आरोपी उमेश जयसिंग ढवळे रा.बारामती वडगाव निंबाळकर सह जप्त केला.

तसेच या प्रकरणी आजूबाजूला तपास केला असता मौजे कशेणे गावाजवळ मुंबई गोवा महामार्गावर टाटा एस क्रमांक.MH.06.BG.0089 मागील ताडपत्री उघडून तपासले असता सदर टेम्पो मध्ये खैर सोलीव नग १३ घमीं ०.२३७ किंमत ३३७४- रुपये इतका व टेम्पो किंमत ६०,०००/- असे एकूण ६३,३७४/- इतका मुद्देमाल बेवारस जमा करण्यात आला पुढील तपास चालू आहे.

रोहा वनविभागाच्या ह्या धडक कारवाई बद्दल सर्वत्र या विभागाचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog