पालीचे नवनिर्वाचित  सहाय्यक पोलीस  उपनिरीक्षक, राम पवार यांची आदिवासी संघटनांनी घेतली सदिच्छा भेट, दिल्या शुभेच्छा,

    पाली -सुधागड (दिनेश पवार ) रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना व दक्षिण रायगड हितरक्षक संघटनेच्या वतीने पाली सुधागड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम मारुती पवार यांना 30 ऑगस्ट रोजी भेट दिली तसेच त्यांचे स्वागत करून सर्व आदिवासी बांधवांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला त्यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस  निरीक्षक विजय तायडे उपस्थित होते.खालापूर पोलीस ठाण्यात सेवेत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम मारुती पवार यांची सुधागड पाली येथे बदली झाली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम पवार हे कर्तव्यदक्ष व कार्यतत्पर पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात परिचित आहेत. शिस्तप्रिय म्हणून त्यांचे नावलौकिक असून खालापूर पोलीस ठाण्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. सामाजिक कार्यातही नेहमी त्यांचा पुढाकार असतो. त्यांनी अनेक आदिवासी तरुणांना घडवले असून त्याच्या मार्गदर्शनाने अनेक तरुण पोलीस सेवेत अधिकारी पदावर कार्यरत आहेत. यावेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पत्रकार भिवा पवार, दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटनेचे उमेश जाधव, वन मित्र राम कोळी, बबन कोळी, संजय कोळी, दिनेश पवार, राम कोळी, मारुती जगताप, सुरेश जाधव, गणेश जाधव, सुरेश पांडू जाधव इत्यादी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.


Comments

Popular posts from this blog