मुंबई-गोवा महामार्गवर धुळीचे साम्राज्य,प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर,      

गोवे-कोलाड (विश्वास निकम

       मुंबई- गोवा या राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड,खांब,सुकेली,वाकण या मार्गावर मोठया प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असुन या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.या महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळे वाहन चालकासह प्रवासीवर्ग पुर्णपणे त्रस्त असतांना हे खड्डे बुजवीले जात असुन या खड्डयात माती मिश्रित खडी टाकल्याने पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.या मार्गावरून चालतांना पादचारी ही पुर्णपणे त्रस्त झाले होते.

 परंतु  चार ते पाच दि वस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असुन याचे रूपांतर धुळीत झाले आहे.ही सर्व धुळ प्रवाश्यांच्या व महामार्गावरील परिसरात असणाऱ्या गावातील नागरिकांच्या अंगावर उडत आहे यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला, व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

             मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरी करणाचे काम गेली अकरा ते बारा वर्षांपासुन अतिशय मंद गतीने सुरु असुन हे काम केव्हा पुर्ण होईल याची खात्री देता येत नाही परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे प्रवाशी वर्ग त्रस्त होतात यामुळे कंबर दुखी सारखे आजार तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे खोकला,सर्दी या सारखे आजार होतांना दिसत आहेत.टूव्हिलर वरुन प्रवास करणाऱ्यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असुन उडणारी धुळ प्रवाशांच्या डोळ्यात उडत आहे यामुळे अपघात ही होतांना दिसत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामुळे अपघाताचे प्रमाण कमी होईल असे वाटत असतांनानवीन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले परंतु अकरा ते बारा वर्षे रस्त्याचे काम सुरु असुन अद्याप हे काम पूर्ण झाले नाही.शिवाय एक खड्डा भरण्यासाठी आठ दिवसातुन चार ते पाच वेळा भर टाकली तरी खड्डा भरेना अशी अवस्था आहे.

      काही दिवसावर  गणेश उत्सव  जवळ आला असुन या महामार्गावरून  लाखो चाकरमानी गणेशउत्सवासाठी कोकणात गावाकडे येत असतात परंतु या रस्त्याच्या धुळीमुळे व खड्डयांमुळे गणेश उत्सवात विघ्न येतांना दिसत आहे शिवाय खड्ड्यात टाकलेली मोठ-मोठी खड्डी रस्त्यावर पसरलेली आहे यामुळे अनेक प्रकारची वाहने पंम्पचर होतांना दिसत आहेत यामुळे रस्त्याचे काम होईल तेव्हा होईल? परंतु जागोजागी खड्ड्यात टाकलेल्या खडीवर डांबर टाकून खड्डे भरावे अन्यथा हेच खड्डे व धूळ वाहनचालक तसेच प्रवाशी वर्गाच्या जिवावर उठतील यामुळे चार ते पाच दिवसात कोलाड ते वाकण दरम्यान डांबर टाकून खड्डे भरावे यामुळे गणेश उत्सवासाठी येणारे प्रवाशी वर्गाचे विग्न तरी कमी होतील असे प्रवाशी वर्गातून बोलले जात आहे.

Comments

Popular posts from this blog