कोरोना काळात येणारे सण, उत्सव, साधेपणात साजरे करावेत,पो.उपनिरीक्षक अनिल घायवत, 


  कोलाड (श्याम लोखंडे)गेली दोन वर्षे आपण सारेजन कोरोना संकटाशी सामना करत आहोत आज देखील त्याचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोरपणे प्रयत्न करत आहोत कोरोना संसर्ग कमी असेल परंतु धोके पुन्हा उद्धभऊ शकतात हिंदू संस्कृतीचे पुढे येणारे सण उत्सव हे आनंदाने साजरे करा परंतु कोरोना संसर्गाचा काटेकोरपणे तसेच शासकीय नियमांचे पालन करून ते साजरे करावेत असे प्रतिपादन कोलाड विभागीय पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक अनिल घायवत यांनी चिल्हे येथे केले.
येणारे दहीहंडी व गणेशोत्सव सण उत्सव हे गावोगावी कोरोनाचे पालन करून करावेत तसेच अनुसूचित प्रकार घडू नयेत याकरिता कोलाड विभागात कोलाड विभागीय पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलीस पथक गावोगावी भेट देत याची माहिती देत असून रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील भेटी दरम्यान ग्रामस्थांना मार्गदर्शन करतांना कोलाड पोलीस उप निरीक्षक घायवत हे बोलत होते .
यावेळी त्यांच्या समावेत पोलीस रामचंद्र ठाकूर गावचे पोलीस पाटील गणेश महाडिक ग्राम पंचायतीचे माजी सरपंच धनाजी लोखंडे ,मारुती खांडेकर सर ,प्रथम नागरिक रघुनाथ कोस्तेकर,सुनील महाडिक प्रमोद शिंदे गाव कमिटीचे अध्यक्ष सुधीर लोखंडे सेक्रेटरी तुकाराम महाडिक,खजिनदार अनंत लोखंडे,रमेश महाडिक, ज्ञानेश्वर लोखंडे,मंगेश लोखंडे ,संदीप लोखंडे,आदी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित पुढे म्हणाले की कायदा आणि सुव्यवस्था तसेच सूचनांचे पालन करत गावात सण आणि उत्सव साजरे केले जातील याची दक्षता घ्यावी असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले.
तसेच यावेळी माजी सरपंच धनाजी लोखंडे व गावचे पोलीस पाटील गणेश महाडिक,पत्रकार श्यामभाऊ लोखंडे यांनी देखील मार्गदर्शन करतांना उपस्थितांसमावेत सांगितले की तंटामुक्त गाव वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेले चिल्हे गाव आहे हिंदू संस्कृतीचे जतन केले पाहिजे ती टिकली देखील पाहिजे परंतु कोणतेही सण अथवा उत्सव साजरे करतांना आपणच आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच हे उत्सव साजरे करू या मागील वर्षाप्रमाणेच याही वर्षी पारंपरिक साजरे केले जाणारे सण उत्सव हे कोरोना काळात प्रशाकीय यंत्रणेनेचे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा पालन करत हे उत्सव साजरे केले जातील अशी ग्वाही ग्रामस्थांच्या वतीने यावेळी देण्यात आली .
प्रसंगी यावेळी ग्रामस्थांच्या वतीने पीएसआय अनिल घायवत यांचे व त्यांच्या समावेत आलेले पोलीस कर्मचारी रामचंद्र ठाकूर यांचे स्वागत ग्रामस्थांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र लोखंडे यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे यांनी केले ,

Comments

Popular posts from this blog