रोह्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची रोहा प्रेस क्लबने घेतली सदिच्छा भेट ,दिल्या शुभेच्छा 

कोलाड (श्याम लोखंडे )  रायगड प्रेस क्लबशी सलग्न असलेली रोहा    तालुक्यातील
  सामाजिक,सांस्कृतिक,शैक्षणिक क्षेत्रातील अग्रगण्य समाजसेवी संस्था रोहा प्रेस क्लबच्या वतीने रोहा पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना आज २६ ऑगस्ट रोजी रोहा प्रेस क्लबच्या वतीने सदिच्छा भेट दिली.दरम्यान भेटीत त्यांचे स्वागत करून सर्व पदाधिकारी व सदस्यांनी सुसंवाद साधला

रोहा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव बंडकर यांची अचानकपणे बदली झाली असल्याने या जागेवर नव्याने नुकतेच पदभार स्वीकारलेले नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना रोहा प्रेस क्लबच्या वतीने सदिच्छा देत त्यांना शुभेच्छा दिल्या ,


   यावेळी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष व रायगड प्रेस क्लबचे सचिव शशिकांत मोरे यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी प्रमुख उपस्थिती मराठी पञकार परिषदेचे पदाधिकारी मिलींद अष्टीवकर,रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव,महेश बामुगडे,जेष्ठ पञकार अरुण करंबे,उपाध्यक्ष अल्ताफ चोरडेकर,कार्याध्यक्ष नरेश कुशवाह,सचिव नंदकुमार मरवडे (सर),सुहास खरीवले,खजिनदार डॉ श्याम लोखंडे , विश्वजित लुमन,जुगल दवे,कल्पेश पवार,अंजुम शेटे,रवींद्र कान्हेकर,केशव म्हस्के,सागर जैन,उद्धव आव्हाड,रविना मालुसरे यांसह सर्व उपस्थित पञकार व रोहा प्रेस क्लब सदस्य आदी उपस्थितांनी पोलीस निरीक्षक संजय पाटील यांची सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या .

तसेच यावेळी रोहा प्रेस क्लब मध्ये नव्याने सदस्यपदी नियुक्ती केलेल्या पत्रकार सदस्यांचे यावेळी रोहा शासकीय विश्रामगृह येथे रवींद्र कान्हेकर, सागर जैन,केशव म्हस्के,रविना मालुसरे यांचे रोहा प्रेसक्लबचे अध्यक्ष शशिकांत मोरे,मराठी पत्रकार परिषदेचे पदाधिकारी मिलिंद अष्टीवकर, उपाध्यक्ष अल्ताफ चोरडेकर रायगड प्रेसक्लबचे उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या ,

Comments

Popular posts from this blog