मुंबई-गोवा महामार्गावर मोकाट गुरांचा हैदोस, वाहन चालक त्रस्त ,अपघाताचा धोका वाढला,
गोवे-कोलाड (विश्वास निकम)
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग १७ वरील कोलाड, खांब, सुकेळी वाकण दरम्यान मोकाट गु्रांच्या वाढत्या संख्येमुळे वाहन चालक त्रस्त झाले असुन यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे यामुळे संबंधित व्यक्तिकडून लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
रोहा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या जवळील मोठ्या प्रमाणावर शेत जमीन मुंबई-पुणे येथील धनिकांना विकल्या असुन भाताचे कोठार म्हणून संबोधला जाणारा रायगड जिल्ह्यात भातशेतीची लागवड क्षेत्र कमी झाले आहे.ज्या शेतकरी वर्गाची शेती आहे त्यांनी आपली भात शेतीची लावणी पुर्ण झाल्यावर आपल्याजवळील असणारी गुरे मोकाट सोडलेली आहेत.
ज्या धनिकांना शेतकऱ्यांनी शेती विकल्या आहेत त्या धनिकांनी या शेतजमिनी भोवती तारेचे कुंपण घातले आहे. यामुळे गुरे चरण्यासाठी जागा उरली नाही. यामुळे मोकाट सोडलेली गुरे ही मुंबई गोवा हायवे वर रस्त्यातच बस्तान मांडत आहेत.यामुळे अगोदरच हायवेवरील खड्ड्यामुळे हैराण झालेले वाहन चालकांना रस्त्यात उभ्या असणाऱ्या मोकाट गु्रांमुळे मार्ग काढतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.तर एखाद्या गु्रांना अपघात झाला तर त्याची भरपाई करण्यासाठी हा गुराखी मालक धावून येतो.याउलट या गु्रांमुळे वाहन चालकाला अपघात झाला तर तो फिरकतही नाही अशा मोकाट गु्रांचा बंदोबस्त संबंधितांकडून करण्यात यावे अशी मागणी वाहन चालक यांच्याकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment