कामगार नेते रजनीकांत कुर्ले, यांचे दुःखद निधन,   

 कोलाड ( विश्वास निकम )

 रोहा तालुक्यातील आंबेवाडी नाका येथील रहिवासी रजनीकांत कुर्ले यांचे शनिवार दि.२८ ऑगस्ट २०२१ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६२ वर्षाचे होते.त्यांनी बिकॉम पर्यंत शिक्षण घेऊन मुंबई येथील भारत टेकसाईल कंपनीत ते नोकरी करीत होते.त्यानंतर त्यांनी ती नोकरी सोडून धाटाव मधील बॉम्बे डाईंग कंपनी नोकरी केली.नोकरी करीत असतांना त्यांनी कामगारांच्या कल्याणकारी योजना राबवून कामगारांची कामे करुन त्यांची मर्जी सांभाळली यामुळे त्यांना सर्व कामगार,कामगार मास्तर या नावाने हाक मारत होते.

      लहानपणा पासुन त्यांना समाजिक,शैक्षणिक,व सांस्कृतिक क्षेत्रात काम करण्याची आवड होती. त्यांनी आंबेवाडी येथील तरुणांना जमवून अमर ज्योत मित्र मंडळाची स्थापना केली व या मंडळाचे अध्यक्ष होते.तसेच ते सार्वजनिक गणपती उत्सवाचे अध्यक्ष, आंबेवाडी ग्रामपंचायतीचे ग्रुप सरपंच होते. त्यांनी गोरगरीब गरजू व्यक्तीना विनामुल्य मद्त केली. त्यांनी विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कामे केली. त्यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असुन त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, एक मुलगी,आई,तीन भाऊ,एक बहीण,व मोठा कुर्ले परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी सोमवार दि.६ सप्टेंबर तर उत्तरकार्य विधी बुधवार दि.८ सप्टेंबर रोजी त्यांच्या आंबेवाडी नाका येथील निवास्थानी होणार आहेत.

Comments

Popular posts from this blog