केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा कोलाड शिवसेनेकडून निषेध

कोलाड (श्याम लोखंडे ) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल तसेच शिवसेना विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आक्षेपार्ह उद्गार काढले. त्यानंतर राज्यभर शिवसैनिकांनी याचा निषेध करत नारायण राणे यांना अटक करावी अशी मागणी करत विविध ठिकाणी याबाबत गुन्हे दाखल करण्यात आले.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची बीजेपी जन आशीर्वाद यात्रा कोलाडात दाखल होताच रोहा कोलाड भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तसेच युवा पिढीने मुबंई गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावर जल्लोषात त्यांच्या आगमनाचे स्वागत करत कोकणचे केंद्रीय मंत्री म्हणून जय घोष केला मात्र हीच जन आशीर्वाद यात्रा रायगड पार करत रत्नागिरीत दाखल होताच मंत्री महोदय राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल केलेले आक्षेपार्ह विधाने तीव्र पडसाद सर्वत्र उमटले आणि ज्या कोलाड नाक्यावर बिजेपीचे केंद्रीय मंत्री राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे स्वागत केले त्याच ठिकाणी शिवसेने निषेध बाजी करत त्यांच्या शिक्षेची मागणी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाचे कोलाड शिवसेनाही या प्रकरणी आक्रमक झाली ना. राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा असे निदर्शने कोलाड नाक्यावर फाटकेबाजीची आतषबाजी करत निषेध केला. रोहा शिवसेना उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे,गणेश शिंदे,विजय बोरकर  आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कोकणात २३ ऑगस्ट पासून सुरु झाली. या यात्रेदरम्यान महाड येथील पत्रकार परिषदे मध्ये नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख ना. उद्धव ठाकरे यांचा अपमान करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले. यानंतर राज्यातील शिवसैनिकांनी राणे यांचा निषेध करत त्यांना अटक करण्यात यावी यासाठी राज्यभर रान पेटविले यात कोलाड विभागीय शिवसेनेनेही नारायण राणे यांचा निषेध करत त्यांना अटक करावी अशी मागणी केली 24 ऑगस्ट रोजी निदर्शनातून आहे. कोलाड आंबेवाडी चौकात सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत नारायण राणे यांच्या विरोधी घोषणा देत त्यांनी केलेल्या वक्तव्या बद्दल त्यांचा निषेध केला.

Comments

Popular posts from this blog