गॅस सिलेंडर तुटवडामुळे व्यवसायिकांवर परिणाम, हॉटेल्स, टपऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर! कामगारांच्या नोकऱ्याही धोक्यात!
गॅसचा काळाबाजार तेजीत असल्याची चर्चा!
कोलाड ( विश्वास निकम)इराण इस्रायल युद्धामुळे होर्मूझची सामुद्रधूनी बंद झाली आहे. यामुळे भारताचा एलपीजी (LPG) पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे हॉटेल्स,टपऱ्या आणि खाद्यपदार्थ टॉल्स बंद पडत असून व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर हॉटेल बंद करण्याची वेळ आली. यामुळे कामगारांचे नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
इराण इस्रायल युद्धामुळे हकाती देशातून होणारा गॅस पुरवठा खंडित झाल्यामुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच उपलब्ध नसल्यामुळे हॉटेल्स व टपऱ्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.तसेच सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे काळ्या बाजारात गॅस आवाच्या सव्वा किमतीने विकला जात आहे.तर तर गॅस महाग व दुर्मिळ झाल्यामुळे चुलीचा किंवा लाकडाचा वापर करत आहेत. यामुळे लाकडाची मागणी वाढली आहे.तर चुलीवर मेनू बनविण्यासाठी वेळ लागत असल्यामुळे गॅसअभावी हॉटेल व्यावसायिक मेनु पदार्थ कमी होत आहे.
तसेच घरगुती गॅस खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या असुन घरगुती गॅसची किंमत ९२८ आहे परंतु गॅस धारकांकडून ९४० ते ९५० घेतले जात असल्याचे बोलले जात आहे.तर गॅस एजन्सीचे कामगार खेड्यापाड्यात आदिवासी वाड्यांवर जाऊन तुम्हाला आम्ही सबशिडी देऊन तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून देऊ तुम्ही गॅस घेऊ नका असे सांगून फसवणूक करीत असल्याची चर्चा असून याचे कारण हा गॅस ब्लॅकने विकून पैसे कमवणे हा असल्याचे बोलल्याचे जात आहे.
प्रतिक्रिया:- गेली २५ ते ३० वर्षांपासून मुंबई-गोवा हायवेवरील सुकेली येथे आमचा विजय हॉटेल सुरळीत पणे सुरु आहे परंतु काही दिवसापासून गॅस तुटवड्यामुळे गॅस बंद झाले यामुळे चुलीवर जेवण बनविणे सुरु असुन चुलीवर जेवण्यासाठी वेळ लागत आहे यामुळे आम्ही ग्राहकांची ऑडर पूर्ण करू शकत नाही.परिणामी व्यावसायावर परिणाम होत असुन लवकरच लवकर गॅस सुरळीत उपलब्ध झाला नाही तर हॉटेल बंद करून उपासमारीचा सामना करावा लागेल.
प्रसाद उंबरे, हॉटेल व्यावसायिक सुकेली

Comments
Post a Comment