पहूर येथील हरवलेल्या व्यक्तीचा मुत्यू देह सापडला, SVRSS टिमच्या शोध मोहिमेचा प्रयत्न
कोलाड (विश्वास निकम)रोहा तालुक्यातील पहुर या गावातील चा मृत्यू देह गावापासून जवळच असलेले एका धरणामध्ये आढळून आला रविवार दिनांक १२/१०/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता, पहूर गावातील रहिवासी श्री. बाळाराम गंगाराम पवार (वय ७० वर्षे) हे गृहस्थ काहीही न सांगता घरातून बाहेर पडले. दिवसभर त्यांचा पत्ता न लागल्याने सायंकाळी ६.०० वाजता त्यांच्या घरच्यांनी गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली.माहिती मिळताच गावकऱ्यांनी एकत्र येऊन शोधकार्य सुरू केले. रात्री १२ वाजेपर्यंत परिसरात सखोल शोध घेण्यात आला, मात्र हरवलेल्या व्यक्तीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत सरपंच, पहूर यांच्या माध्यमातून सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (SVRSS) या संस्थेला माहिती देण्यात आली. संस्थेला माहिती मिळाल्यानंतर सोमवार दि. १३/१०/२०२५ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या पथकाने ड्रोनच्या साहाय्याने शोधकार्य सुरू केले. गावापासून साधारण दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका धरण परिसरात फक्त पाच मिनिटांच्या फर्स्ट टेक-ऑफमध्येच हरवलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. शोधकार्य पूर्ण यशश्विकरण्यासाठी या कार्यात स्थानिक ग्रामस्थ, ग्रामपंचायत व SVRSS टीमचा सक्रिय सहभाग पुढील तपास कोलाड पोलीस ठाणे करत आहेत.
Comments
Post a Comment