रोहा येथे गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
जनतेचा उदंड प्रतिसाद!
रोहा (प्रतिनिधी ) हिंदूहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रोहा येथे गरुड झेप फाउंडेशनच्या वतीने 22 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरुड झेप फाउंडेशन तर्फे 13 वे रक्तदान शिबिर मातोश्री मंगल कार्यालय रोहा येथे संपन्न झाले यावेळी साठ रक्त पिशव्या जमा करण्यात आल्या गरुड झेप संस्थेचे अध्यक्ष दुर्गेश नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले त्यांना सहकार्य यतीन धुमाळ, दत्ता साळुंखे, दिप्रेश सावंत, प्रणय मोहिते, केदार आंब्रे, दीपक तेंडुलकर, भूषण देशपांडे,विनोद सावंत, राजकुमार विश्वकर्मा आदी कार्यकर्त्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.
सदर शिबिरास महाराष्ट्र शासनाच्या राज्य रक्त संक्रमण परिषद अलिबाग या रक्तपेढीमध्ये हे रक्त जमा करण्यात आले.
सदरील शिबिर बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी 23जानेवारीला करण्यात येते परंतू त्यावेळी आचारसंहितेच्या कारणास्तव 22मार्च 2026रोजी घेण्यात आले. सदर रक्तदान शिबिरास रोह्यातून उदंड प्रतिसाद लाभला.



Comments
Post a Comment