डॉ. सागर सानप यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान,सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

   

कोलाड (विश्वास निकम) रायगड रोहा तालुक्यातील तसेच कोलाड विभाग पुई गावाचे सुपुत्र डॉ.सागर विठोबा सानप यांना प्रागतिक लेखक संघ व निर्मिती विचारमंच कोल्हापूर यांच्या वतीने सोमवार दि.२८ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत शुभेच्छाचा वर्षाव केला जात आहे .

   डॉ. सागर सानप हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून कोलाड रोहा लायन्स क्लबचे अध्यक्ष असून ते मुंबई कुणबी समाज संघ , रायगड जिल्हा कुणबी समाज, रोहा तालुका कुणबी समाज,ओबीसी समाज या संघटनेत समाज हिताचे काम करीत आहेत.या सामाजिक कार्याची दख्खल घेत राष्ट्रपिता महात्मा जोतिबाफुले यांच्या स्मुतीदिनाचे औचित्य साधून राजेर्षी शाहू स्मारक भवन,मुख्यसभागृह कोल्हापूर येथे डॉ. सागर सानप यांना राज्यस्तरीय सत्यशोधक पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .

         यावेळी डॉ.श्रीपाल सबनीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन माजी अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रा.डॉ.राजेखान शानेदिवाण जेष्ठ साहित्यिक व विचावंत,खासदार धैर्यशीलदादा माने,खासदार निवेदिता माने,डॉ.सुरेशराव जाधव,विजय कांबळे,डॉ.अरुण भोसले, डॉ. राजेंद्र दास,प्रा.डॉ.प्रशांतकुमार कांबळे,महादेव निर्मिले, सुरज वाघमारे,यांच्या शुभहस्ते डॉ.सागर सानप यांना हा पुरस्कार देण्यात आला.या पुरस्काबद्दल कोलाड रोहा लायन्स क्लब,मुंबई कुणबी ग्रुप,रायगड जिल्हा कुणबी ग्रुप, रोहा तालुका कुणबी ग्रुप व संपूर्ण ओबीसी समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी डॉ.सागर सानप यांचे सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Comments

Popular posts from this blog