एसटी बस सेवा वेळापत्रक झाले बेभरवशाचे वेळेवर बस सुविधा मिळत नसल्याने प्रवाश्यांचा संताप तर एकच झुंबड,

कोलाड(श्याम लोखंडे) राज्याच्या सत्ता संघर्ष नाट्यात सर्वसामान्य जनतेचे प्रचंड हाल होत आहेत तर एकीकडे नेतेमंडळी एकमेकांचे वस्त्रहरण करण्याच्या नादात तर सत्तेची खूर्ची ही आपल्याकडेच ठिकून राहिली पाहिजे यासाठी मोठं मोठया उपाययोजना आखल्या जातात त्या किती अमलात तर किती अर्धवट याचे कोणालाही गणित नाही त्यामुळे सर्व सामान्य जनता ही त्यात कायम भरडली जात आहे तर कोकणातून मुबंईकडे तर मुबंईतुन कोकणाकडे धावणाऱ्या महामंडळाच्या प्रवासी एसटी बस सुविधा सेवा बेभरवशाच्या झाल्या आहेत कोणतीच एसटी बस वेळेवर मिळत नसल्याने महाडकडून मुबंईकडे जाणारे व मुबंई पनवेल कडून महाडकडे प्रवास करणारे प्रवाशी अक्षरशः संतापले असून दीड दोन तासाने एखादी बस आली रे आली की त्या बसवर प्रवाश्यांची एकच झुंबड होत आहे.तर तीच अवस्था पनवेल बस स्थानकात प्रवाशी वर्गाची होत असून पनवेलहुन नागोठणे, कोलाड, इंदापूर, माणगाव,महाड कडे येणाऱ्या प्रवासी वर्गाची होत आहे.तर खाजगी वाहने मनमानी प्रमाणे इंदापूर ते पनवेल तसेच पनवेल हुन कोलाड इंदापूर अडीशे ते तीनशे रुपये भाडे लावतात त्यामुळे सर्वसामान्यांची त्यांच्याकडून अक्षरशः लुटच म्हणावी लागेल ही परिस्थिती आहे

मुबंई हुन कोकणाकडे व कोकणकडून मुबंईकडे धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा वेळापत्रक बेभरवशाचा झाला आहे त्यामुळे पहाटेच्या धावणाऱ्या एसटी बसची सेवा ही प्रवासी वर्गाला वेळेवर मिळत नसल्याने महाड , माणगाव, इंदापूर, कोलाड,नागोठणे कडून पेन पनवेल मुबंई कडे जाणाऱ्या प्रवाश्यांची मोठी सर्व स्थानकात मोठी गर्दी व भीड लागलेली असते तर एसटी बस ची सुविधा वेळेवर मिळत नसल्याने कामावर जाणारे कामगार तसेच उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी तर काही प्रवास करणारे प्रवासी यांना आपापल्या वेळेवर पोहचता येत नाही तर तर चाळीस ते पन्नास किलोमीटर अंतर प्रवास करण्यास दोन तास मार्गावर भयानक पडलेल्या खड्ड्यांमुले होत असल्याने विद्यार्थी वर्गाला याचा मोठा फटका बसत आहे.रस्तावर व स्थानकात तासंतास उभे ताटकळत बसलेले प्रवासी हे अक्षरशः मेटाकुटीस येतात तर काही तासांनी बस येते तीही फुल असते त्यामुळे येणाऱ्या बसवर एकच झुंबड उडते तर यात जेष्ट नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत.

कायम आजारी असलेले पनवेल आगारचे वेळापत्रक 

मागील काही महिने राज्याच्या सत्ता संघर्ष नाट्यात येथील प्रवासी वर्गाला कोकणात धावणाऱ्या रेल्वे सुविधा देखील वेळेवर मिळत नाहीत तर त्यांच्या देखील वेळापत्रकात बदल केले गेले आहेत तर काहीं एक्स्प्रेस धावणाऱ्या गाड्यांना आधी मध्ये स्टॉप नसल्याने त्यातून प्रवास करता येत नाही मुबंई गोवा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरच्या कामाचा गळतथान कारभारात व राज्य सरकारच्या सत्ता संघर्ष नाट्यात आता प्रवाशी वर्गाचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहेत खड्यांमुळे महामंडळाच्या बस वेळेत पोहचत नाहीत तर खड्डे हे बारमाही प्रवासी वर्गाच्या जीवावर बेतले आहेत याकडे दुर्लक्ष होत आहे सारे नेते एकमेकांच्या खुर्च्या टिकून ठेवण्यात वेस्त तर जो तो विविध स्थरावर संपन्न होत असलेल्या निवडणुकीत कोणत्या गटाचे किती उमेदवार निवडून येतात यावर मोठे नियंत्रण तर नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधा याकडे मात्र दुर्लक्षित केले जात आहे याला जबाबदार कोण असा सवाल सर्वत्र व्यक्त होत आहे .तसेच खाजगी वाहने ही त्यांच्या मनमानी कारभार चालवत भाडे घेत आहेत त्यामुळे ते सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने त्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे.

प्रतिक्रिया:-

तसेच काही दिवसांवर आता दिवाळी येऊन ठेपली असून या सेवा अशाच प्रकारे सुरू राहिल्या तर अधिक प्रवासी वर्गात संतापाची लाट सुरू राहिली तर प्रवास करणारे प्रवासी आक्रमक होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत तर तासंतास प्रतीक्षा करावी लागणाऱ्या एसटी महामंडळाच्या बस वेळेवर येणे अथवा अधिक जादा बस सेवा महामंडळाने व राज्य सरकाने कराव्यात अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे .अनिल महाडिक सामाजिक कार्यकर्ते कोलाड

Comments

Popular posts from this blog