ओबीसी जनमोर्चाच्यावतीने जातीनिहाय जनगणनासाठी रायगडात १० नोव्हेंबर रोजी  जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा निघणार!

न्यायी हक्कासाठी,भावी पिढीच्या उत्कर्षासाठी हजारो समाज बांधव उपस्थित राहणार!

कोलाड (श्याम लोखंडे) ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना होत नाही तो पर्यंत ओबीसींची संख्या कळणार नाही.त्यामुळे ओबीसीचे अपेक्षीत हक्क मिळणार नाही.यासाठी जातीनिहाय जनगणना ची मागणी घेत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा च्या वतीने १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जातीनिहाय जनगणना सह अन्य मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांचा धडक मोर्चा काढणार असल्याचे रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चा यांची जिल्हा कार्यकरणी बैठकीत ठरविण्यात आले.

रायगड जिल्हा ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न जनमोर्चा या संघटनेची सभा नुकतीच शासकीय विश्रामगृह रोहा येथे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश मगर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आली यावेळी सर्व ओबीसी बांधव यांच्या समावेत ही घोषणा करण्यात आली आहे

 यावेळी प्रमुख उपस्थितीत ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर,ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष जे.डी.तांडेल,परीट समाज कोकण विभाग अध्यक्ष नंदकिशोर राक्षे, ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुदाम शिंदे, प्रद्युम्न ढसाळ,सुरेश पाटील,जिल्हा कार्यकारणी सदस्य शिवराम शिंदे,शिवराम महाबळे,बाळशेठ खटावकर,माणगाव कुणबी समाज ता. अध्यक्ष सुभाष भोनकर,आगरी समाज रोहा तालुका अध्यक्ष हरीचंद्र मोरे,माजी सभापती लक्ष्मण महाले,तळा सभापती सौ अक्षरा कदम,पत्रकार संध्या पिंगळे,ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्ष अनंत थिटे,सरचिटणीस महादेव सरसंबे,रोहा तालुका उपाध्यक्ष उत्तम नाईक,अमोल पेणकर,काशीनाथ धाटावकर,नंदकुमार म्हात्रे,महेश बामुगडे,सुहास खरीवले,तळा तालुका अध्यक्ष सचिन कदम,मुरूड तालुका अध्यक्ष अॅड रुपेश पाटील,माणगाव तालुका अध्यक्ष अरुण चाळके,सरचिटणीस राजेंद्र खाडे,म्हसळा तालुका अध्यक्ष महादेव पाटील,पेण तालुका समन्वयक दिलीप पाटील,नाभीक समाज जिल्हा सरचिटणीस महेंद्र माने,श्याम लोखंडे,अमित मोहीते,प्रकाश कोळी,मंगेश रावकर, महेंद्र मोरे, प्रेषीत बारटक्के,नवनीत डोलकर,लक्ष्मण मोरे,सतिष भगत,रामाशेठ म्हात्रे,अरविंद मगर,राम नक्ती,आदी सर्व जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी ओबीसी जनमोर्चाचे कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर, उपाध्यक्ष जेडी तांडेल, रायगड जिल्हा अध्यक्ष सुरेश मगर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी आज जागृत होण्याची गरज आहे.

ओबीसी समाजाच्या  न्यायी हक्कासाठी भविष्यातील भावी पिढीच्या उत्कर्षासाठी समाजबांधवानी एकत्रीत येत १० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चात ओबीसी समाज बांधवांनी सामील होण्याचे आवाहन याप्रसंगी केले. राज्यासह देशात ओबीसीचे संख्या अधिक आहे. परंतु ओबीसींची जनगणना शासनाकडून करण्यात न आल्याने ओबीसी समाजाची संख्या कळत नाही. त्यामुळे ओबीसी समाज व त्याला शासनाच्या मिळणाऱ्या सोयी, सुविधा या पासून हा घटक वचिंत राहिला आहे गेली अनेक वर्षे देशातील ओबीसी समाज सामाजिक,आर्थिक राजकीयदृष्ट्या मागासलेला आहे. त्यामुळे येत्या कालावधीत रायगड जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाज बांधवांना एकत्रित करुन ओबीसी  समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात लढा उभारला जाणार असल्याचे रायगड जिल्हा ओबीसी जनमोर्चा चे अध्यक्ष सुरेश मगर यांनी रोहा येथे ओबीसी संघर्ष समन्वय समिती संलग्न ओबीसी जनमोर्चा रायगड जिल्हा कार्यकरणी सभेत व्यक्त केले.

 बैठकीत दक्षिण रायगडची  तालुका निहाय कार्यकारणी निवड झाली असून येत्या आठवडा भरात उत्तर रायगड,जिल्हा कार्यकारणी,महीला व युवक कार्यकारिणी निवडण्यात येणार असून ती गठित करणयात येणार असल्याचे सांगितले.यावेळी जिल्हा महीला अध्यक्षपदी सौ अक्षरा कदम,रोहा तालुका युवक अध्यक्षपदी लक्ष्मण मोरे यांची  निवड करण्यात आली.या बैठकीत निवड झालेले तालुका अध्यक्षाना निवडीचे पत्र उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी ओबीसी नेत्यांनी ओबीसी समाज बांधवांना अधिकाधिक एकत्रित करून आपल्या न्याय हक्कासाठी ओबीसी जन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.त्याच बरोबर  प्रमुख पदाधिकारी यांनी आपापले मनोगत व्यक्त केले.मोठ्या उत्साही आणि उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या या सभेचे सूत्रसंचालन व आभार रोहा तालुका सरचिटणीस महादेव सरसंबे यांनी केले.या सभेस रायगड जिल्ह्यातील ओबीसी समाजातील विविध समाजाचे कोकण, जिल्हा,तालुका अध्यक्ष पदाधिकारी, ओबीसी जनमोर्चाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog