पुगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निलम कळमकर यांची बिनविरोध निवड             

खांब (नंदकुमार कळमकर) रोहा तालुक्यातील पुगांव ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ नीलम कळमकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या ग्राम पंचायत मधील पदावर कार्यरत असलेले उपसरपंच राम धुपकर यांनी आपल्या ठराविक ठरलेल्या कार्यकाळ प्रमाणे व दिलेल्या वचनाप्रमाणे या पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झालेल्या उपसरपंचपदी कार्यरत असलेल्या सदस्या सौ नीलम कळमकर यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

राष्ट्रवादी पक्षाचे रायगडचे लोकप्रिय खासदार सुनील तटकरे ,यांच्या कृपाआशीर्वादाने ,रायगडच्या माजी पालकमंत्री तथा आमदार कु. अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस जेष्टनेते नारायणराव धनवी यांच्या प्रमुख उपस्थितीत यांची निवड करण्यात आली.

यावेळी ग्रामसेवक गोविंद शिद, पवार मॅडम ,व पुगांव गावचे जेष्ठ नागरिक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ट नेते नारायणराव धनवी, यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. प्रसंगी यावेळी आंबेवाडी जिल्हा परिषद गणांचे अध्यक्ष युवा कार्यकर्ते नरेंद्र जाधव,महेंद्र पोटफोडे सरपंच गोवे ग्रुपग्रामपंचायत, मनोज शिर्के उपसरपंच खांब,तसेच पुगांव ग्रामपंचायत सदस्य राम धुपकर यांनी निलम कळमकर  यांचे उपसरपंचपदी नाव सुचवल्यानंतर ग्रामपंचायत सदस्या अदिती झोलगे यांनी अनुमोदन दिले व त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कोरोना काळात गावातील सर्वांगिक विकासकामे प्रलंबीत राहिली असून त्यामुळे गावाचा विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन, सर्वांना बरोबर घेऊन लोकप्रिय खासदार नेते सुनील तटकरे, आ अदिती तटकरे,आ अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रेरणेंतून तसेच सरपंच व  ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नवनिर्वाचित उपसरपंच निलम कळमकर यांनी व्यक्त केली.यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवरांनी व माजी उपसरपंच राम धुपकर, अदिती झोलगे, रचना कळमकर,गणेश म्हसकर, ग्रामसेवक गोविंद शिद, अनंत म्हसकर, उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog