रोहा चिल्हे येथे धाक्सुद महाराज पालखी सोहळा मोठ्या उत्साहात, पुष्पवृष्टीची उधळण करत धाक्सुद महाराजांचा जयघोष! 

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथे नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आराध्य ग्रामदैवत धाक्सुद महाराज यांचा नवरात्रोत्सव हा रोहाचे आराध्यदैवत धावीर महाराज यांच्या प्रमाणेच साजरा केला जातो नवरात्रीचे नव दिवस येथील ग्रामस्थ व धाक्सुद क्रीडा मंडळाचे युवक विविध कार्यक्रम व उपक्रम करत दासराउत्सव साजरा करतात तर अकराव्या दिवशी श्री धावीर महाराज यांच्या पालखी सोहळ्याबरोबरच येथील या देवाचा पालखी सोहळा येथील ग्रामस्थ महिला युवक व युवती एकत्रितपणे साजरा करतात तर पालखीवर फुलांची उधळण करत तसेच फटाक्यांची आतषबाजी लेझीम पथक ,फुगडी,नाच गाणे ,धार्मिक तथा आध्यत्मिक सतं महातम्यांच्या अभंगाने नामघोष करत हा सोहळा मोठ्या आनंदात साजरा झाला.

या उत्सवानिमित्त मंदिराचा संपूर्ण व गाव परिसर विविध रंगी फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले होते,प्रत्येकाने आपल्या अंगणात धाक्सुद महाराज,भैरव,चिल्लाई माता,जोगेश्वरी, हनुमंत राय या देवांची पालखी येणार असल्याने सुंदर रांगोळयांनी वातावरण प्रसन्न झाले होते. दुपारी चार वाजता मंगलमय वातावरणात गोंधळ्यांच्या पारंपरिक वाद्याने ग्रामदैवताची महाआरती करत धाक्सुद महाराजांचा जयघोष करत पालखी पारंपारिक टाळ मृदुंग व वाद्यांच्या गजरात मार्गस्त झाली.संपूर्ण गाव आनंददायी वातावरणात व ग्रामस्थांच्या अंगणात ठिकाणी कुटूंब ग्रामस्तांना दर्शन देत पालखी रात्रौ दहा वाजता मंदीरात परतते. यावेळी पून्हा महाराजांना व पालखीच्या स्वागतासाठी गावात सर्व धाक्सुद क्रीडा मंडळाच्या युवकांनी आणी विशेष करून रात्रीच्या वेळी करण्यात आलेल्या मंदिर परिसर रोषनाई या सोहळयाला एक वेगळे रूप प्राप्त करून देते होते ,तर काही ठिकाणी पालखीच्या सोबत असलरले भाविक महिला मंडळ भजन मंडळसााठी ठिकठिकाणी विविध मंडळांमार्फत व भाविकांनी थंड पेये चहा अल्पपोहाराची व्यवस्था केली होती.

उत्साही वातावरण लाभलेल्या या नवरात्रोत्सव व विजया दशमी व दासरा उत्सव सोहळ्यात आळंदीहून खास ह भ प नारायण महाराज नागोरगोजे यांची कीर्तन करत पालखी सोहळ्याला शुभेच्छा दर्शवतात तर कोलाड विभागीय पोलीस अधिकारी यांनी सदिच्छा भेट देत दर्शन घेतले तसेच पंचक्रोशीतुन देखील भक्त भाविक या पालखी सोहळ्यात सहभागी होत आनंद लुटतात येथील युवक मंडळांनी या नवरात्रोत्सवात खास युवकांसाठी व महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबवत सर्वांना मंडळाच्या वतीने महाप्रसाद भोजनाचा लाभ देत सांगता समारोह करण्यात आले.

  धाक्सुद महाराज पालखी सोहळा ग्रामस्थ व परिसरातील लोकांसाठी पर्वणीच असते :-माजी सरपंच तथा गाव कमिटी अध्यक्ष धनाजी लोखंडे 

आमच्या गावात परंपरेचा हा उत्सव सोहळा गावचे ग्राम दैवत धाक्सुद महाराज यांचा नवरात्रोत्सव हा रोहाचे आराध्यदैवत धावीर महाराज यांच्या प्रमाणेच साजरा केला जातो नव दिवस युवक विविध खेळ व उपक्रम करत आनंद लुटतात नवरात्र उत्सव जागर पहारा करत दहाव्या दिवशी दसरा उत्सव व अकराव्या दिवशी श्री धावीर महाराज यांच्या पालखी बरोबरच या देवाची पालखी संपूर्ण गावात फिरून सहकुटुंब सह परिवारात दर्शन घडते तसेच महेर वाशीन देखील सह कुटूंब सह परिवार या पालखी सोहळ्याचा दर्शन घेत आनंद लुटतात. खरोखरच महाराज पालखी सोहळा म्हणजे ग्रामस्थ व परिसरातील लोकांसाठी एक पर्वणीच असते या पालखी सोहळ्याला ग्रामस्थ तसेच आजूबाजूच्या परिसरातून हजारो भक्त येतात अशी प्रतिक्रिया माजी सरपंच तथा गाव कमिटी अध्यक्ष धनाजी लोखंडे यांनी दिली.

धाक्सुद महाराज पालखी सोहळा पाहून मी क्षणभर भावुक झालो:-सहाय्यक पोलीस विक्रांत फडतरे,

पालखी उत्सव पाहून आनंद निर्माण झाला संपूर्ण गावातील नागरिक युवापिढी महिला वर्ग एकसंघ एकरूप या सोहळ्याचा आनंद घेतात धार्मिक आणि आध्यत्मिक चळवळीची आवड असल्याचे या ग्रामस्थांकडून दिसले परंतु सार्वजनिक उत्सव साजरा करत असतांना कायदा सुव्यवस्था यांचा पालन करत सगळे सण उत्सव साजरे केले पाहिजे असा संदेश देत  पालखी सोहळ्याला सदिच्छा भेट देत क्षणभर मी भावुक झालो. अशी प्रतिक्रिया सहाय्यक पोलीस विक्रांत फडतरे यांनी दिली.

Comments

Popular posts from this blog