दिवाळी पहाट असंख्य दिव्यांनी उजळून निघाला अवचितगड शिवशंभु प्रतिष्ठाने ऐतिहासिक महत्त्व जपत केला दीपोत्सव साजरा

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील गडसंवर्धनातील अग्रमानांकीत शिवशंभु प्रतिष्ठान या संस्थेमार्फत अवचितगडावर दिवाळी पहाट निमित्ताने औचित्य साधून येथील शिवप्रेमी शिलेदारांनी व ३५० मावळ्यांच्या उपस्थितीत दिपावली पहाटचा ऐतिहासिक असा दिव्यांच्या ज्योत पेटवत दीपोत्सव कार्यक्रम करत मोठ्या उत्साहात साजरा केला तर संपूर्ण अवचितगड हा दिव्यांनी सजल्यानी उजळून निघाला होता .त्यामुले एक ऐतिहासिक स्वरूप याप्रसंगी या गडावर आल्याचे सर्वांना पहावयास मिळाले.

शिव छञपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील अवचितगडावर शिवशंभु प्रतिष्ठान मार्फत गेली आठ वर्ष गडकोट संवर्धन मोहिमांचे आयोजन केले जाते. त्याच सोबत पहिले तोरण गडाला या भावनेतून दसरा गडपुजन तथा पहिला दिवा गडकोटांच्या चरणी या भावनेने दिपावली पहाटचे आयोजन केले जाते.

दिपावली पहाटचे औचित्य साधून या कार्यक्रमाला रोहा तालुक्यातील असंख्य शिवप्रेमी शिलेदार युवक तरुण आवर्जून उपस्थित असतात. या राञी गडावर शिवकालीन मर्दानी खेळांची प्रत्यक्षीके उपस्थित शिभक्तांनी सादर करत जणू गडावर शिवकाळ अवतरला होता तसेच तद्नंतर गोंधळाचे आयोजन करुन आलेले शिवप्रेमी हातात दिवटी घेऊन तल्लीन होऊन आनंद लुटत होते.गडावर मशालिंच्या सहाय्याने बुरूजावर रोषणाई देखील करण्यात आली होती  तसेच मशालींच्या सहाय्याने  गडाला प्रदक्षिणा घालून मशाल याञा या मावळ्यांनी काढत सकाळी पहाटे उठून गडावरील महादेवाच्या मंदिरात दीपोत्सव करुन दिपावली पहाटचा कार्यक्रम मोठ्या आनंदाने छत्रपती शिवरायांच्या जयघोषात व उत्साहात साजरा करण्यात आले .

प्रतिक्रिया:-पहाटे दीपोत्सव झाल्यांनंतर दिपोत्सवाचे तसेच शिवकालीन संस्कृती विषयक मार्गदर्शन प्रतिष्ठानचे मार्गदर्शक अमरदिप म्हाञे यांनी उत्तमरीत्या उपस्थित शिलेदार व शिवप्रेमी यांना केले तसेच केलेल्या मार्गदर्शनातून आम्हा सर्वांना अधिक अधिक या ऐतिहासिक गडांचा ठेवा व त्याचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी अधिक बळ मिळेल .तसेच पुढेही शिवशंभु प्रतिष्ठान असेच कार्यक्रमाचे आयोजन करत राहील तथा गडसंवर्धनात तालुक्यातील शिवप्रेमींनी व तरूणांनी अधिक अधिक सहभागी व्हावे असे आवाहान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल तेलंगे यांनी या प्रसंगी केले.

Comments

Popular posts from this blog