नवरात्रोत्सवात चिल्हे येथे खेळ रंगला पैठणीचा धाक्सुद मंडळाने आयोजित केलेल्या पैठणी खेळाच्या मानकरी ठरल्या सौ.ममता महाडिक

खांब (नंदकुमार कळमकर) नवरात्रोत्सवाची धामधूम सर्विकडे भक्तिमय वातावरणात सुरू आहे या काळात स्थानिक पातळीवर ग्रामस्थ युवक मंडळ यांच्या वतीने विविध उपक्रम राबिवले जातात याच अनुषंगाने रोहा तालुक्यातील मौजे चिल्हे येथील धाक्सुद क्रीडा मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवून येथील महिला भगिनींसाठी खास खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याला येथील महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला तर खेळ रंगलेल्या अटीतटीच्या व चढाओढीच्या पैठणीच्या खेळातील पैठणीच्या विजेत्या ठरल्या त्या सौ ममता नरेश महाडिक वहिनी तर उपविजेत्या सौ मानसी लोखंडे ,सौ मीनाक्षी शिंदे व सौ अश्विनी शिंदे या वहिनी ठरल्या आहेत

उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेला नवरात्रोत्सव काळात येथील धाक्सुद मंडळांनी आराध्यदैवत धाक्सुद महाराज मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या अनोखा उपक्रम व विशेष खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते तर रंगलेल्या पैठणीच्या खेळासाठी येथील महिला वर्गानी मोठा सहभाग नोंदवून विविध खेळांचा आनंद घेत रसिकप्रेशकांची मने जिंकत त्यांना भरभरून प्रतिसाद दिला तर विविध प्रकारच्या व पैठणीच्या  खेळात जवळपास ऐंशी हुन अधिक महिला सहभागी झालेल्या होत्या सदरच्या खेळात कोणत्याही प्रकारची वयोमर्यादा अट नसल्याने बहुसंख्येने महिला या खेळात सहभागी झाल्या होत्या.

 अद्भुतपूर्व प्रतिसाद लाभलेल्या या कार्यक्रमाचे शुभारंभ गावचे अध्यक्ष तुकाराम कोंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी ग्राम पंचायत सरपंच सौ मानसी लोखंडे,सदस्या सौ रिया लोखंडे ,सुनील महाडिक,डॉ श्यामभाऊ लोखंडे ,मंगेश लोखंडे,सह आदी ग्रामस्थ व महिला वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते शेवटी या रंगतदार कार्यक्रमाच्या खेळ पैठणीच्या विजेत्या व मानकरी ठरल्या विजेत्यांना सौ पूजा लोखंडे यांच्या हस्ते सौ ममता नरेश महाडिक ,यांना पैठणी देऊन सत्कार करण्यात आला तर उपविजेत्या ठरलेल्या सौ मानसी लोखंडे,सौ अश्विनी शिंदे,सौ मीनाक्षी शिंदे यांना तुकाराम कोंडे,महेश लोखंडे,रायगड पोलीस कु शीतल महाडिक ,प्रवीण मरवडे,प्रफुल लोखंडे,दीपेश महाडिक यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तर उत्साह आणि आनंदायी वातावरनात विजेत्या ठरलेल्या या महिलांचे त्यांच्या कुटूंबियांनी मोठे कौतुक केले व अति उत्साह म्हणून पतीने त्यांना उचलून त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या तसेच या खेळात सहभागी झालेल्या महिलांना देखील भेट वस्तू देत त्यांचे या मंडळाच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या वतीने सत्कार करण्यात आला .

मंडळांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पत्रकार डॉ श्यामभाऊ लोखंडे  यांच्या कडून पैठणी देण्यात आली तर  प्रवीण मरवडे,कु शीतल महाडिक रायगड पोलीस,प्रफुल महाडिक,दीपेश महाडिक ,यांच्या कडून उपविजेत्याना बक्षीस देण्यात आले होते

 तर सहभागी झालेल्या सुधीर लोखंडे व अनिल महाडिक यांच्या कडून भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाचे व पैठणीच्या खेळाचे सुसज्ज संचालन ऍड हर्षद साळवी यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धाक्सुद  मंडळ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog