रोह्यात ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाची बैठक,

संघटना वाढीवर जोर! 

रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अनंत थिटे

जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नंदकुमार म्हात्रे यांची निवड

खांब(नंदकुमार कळमकर) रोहा तालुका ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चाची तालुका कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी रोहा शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा रोहा तालुका अध्यक्षपदी अनंत थिटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी नंदकुमार म्हात्रे यांची निवड करण्यात आली.

या बैठकीस ओबीसी संघर्ष समन्वय समिती तथा ओबीसी जनमोर्चा जिल्हाअध्यक्ष सुरेश मगर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य मधुकर पाटील,अॅड मनोजकुमार शिंदे,संतोष खटावकर,शिवराम महाबळे,उपाध्यक्ष अमोल पेणकर,सरचिटणीस महादेव सरसंबे,सल्लागार काशीनाथ धाटावकर,रामचंद्र सकपाळ,अनंत जंगम,खजिनदार दत्ताराम झोलगे,सहचिटणीस महेश बामुगडे,मंगेश रावकर,विभागीय अध्यक्ष भातसई नंदकुमार म्हात्रे,धाटाव अमित मोहीते,खांब शाम लोखंडे,चणेरा संतोष देवळे,नामदेव सुतार,विनायक धामणे,राजेश कदम,धाटाव विभाग सरचिटणीस लक्ष्मण मोरे,रोहा शहर खजिनदार महेंद्र मोरे,उपसरपंच अरविंद मगर  आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मधुकर पाटील यांनी ओबीसी समाजाने आपल्या न्यायी हक्कासाठी काम करण्याचे सांगितले,सुरेश मगर यांनी सर्व समाजांनी एकत्रीत आले पाहीजेत.ओबीसी जनमोर्चा ही संघटना मजबूत करण्याचे आवाहन केले.अॅड मनोजकुमार शिंदे यांनी ओबीसी जनमोर्चा संघटनेत सर्व ओबीसी समाजाला जास्तीत जास्त काम करण्याची संधी मिळाली पाहीजेत.शिवराम महाबळे यांनी संघटना अधिक प्रभावी करण्याचे आव्हान केले.

महादेव सरसंबे यांनी आपल्या प्रास्ताविकात ओबीसी संघटना तालुक्यात मजबुत करत असताना भविष्य विविध कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले.

या वेळी ओबीसी जनमोर्चा जिल्हा अध्यक्षपदी सुरेश मगर,राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्षपदी मधुकर पाटील,शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुखपदी   ऍडव्होकेट  मनोजकुमार शिंदे व नवनिर्वाचित ओबीसी जनमोर्चा तालुका अध्यक्ष अनंत थिटे यांची निवड झाल्याबद्दल ओबीसी जनमोर्चाच्यावतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog